पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाही पाण्यात वाहून चाललेल्या दोघांचा जीव वाचवणाऱ्या योगेश भोसले या चऱ्होलीतील धाडसी तरूणाचा दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या दोघांना सुखरूप पाण्याबाहेर काढले, तेव्हा खूपच समाधान लाभले, अशी भावना योगेशने यावेळी बोलताना व्यक्त केली. (pcmc)
दिशा सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संतोष बाबर, संचालक गणेश लंगोटे, नंदकुमार कांबळे, अविनाश ववले, बाजीराव लोखंडे यांनी भोसले यांच्या चऱ्होलीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. सन्मानचिन्ह देऊन दिशाच्या वतीने सत्कार करण्यात आला. (pcmc)
पिंपरी चिंचवड शहरात २५ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला होता. गावोगावी रस्त्यांवर सगळीकडे पाणी साचले होते. जागोजागी खड्डे तयार झाले होते. समोरचे काहीच दिसत नव्हते. अशावेळी चऱ्होलीत एक मोटार पाण्याने ओढली जाऊ लागली. ती मोटार एका मोठ्या खड्ड्यात पडणार, तेवढ्यात योगेश भोसले याने वाहून चाललेल्या या पिता पुत्राला मोटारीतून बाहेर काढले. मदतीसाठी कोणीही पुढे आले नसताना स्वतच्या जीवाचा विचार न करता त्याने धाडस दाखवून त्या दोघांचा जीव वाचवला.
योगेशच्या या धाडसाचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे. योगेशच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी दिशा सोशल फाऊंडेशन कडून त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना योगेशने सांगितले की, त्या दिवशी त्याने मदतीसाठी काही नागरिकांना हाक दिली होती. एकट्याला त्या दोघांना गाडीमधून बाहेर काढणे अवघड जात होते. मात्र कुणीही मदतीला आले नाही. अनेकजण व्हिडिओ काढत होते. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील पुढे पाण्याच्या प्रवाहात जाण्यास विरोध केला होता.
पण आपल्यासमोर असे घडत असताना गप्प बसून चालणार नाही. भविष्यात कायम मनात रुख रूख राहील, की आपण ते दोन जीव वाचवू शकलो नाही, असे वाटले. त्या दोघांचा जीव वाचावल्यावर आत्मिक समाधान मिळाले. (pcmc)
हेही वाचा :
भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !
मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले
वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक
१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का
Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा
कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी