Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याPune : पुणे येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अंतर्गत 'लिपिक टंकलेखक' पदांची...

Pune : पुणे येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अंतर्गत ‘लिपिक टंकलेखक’ पदांची भरती

Pune, दि. १०: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे लिपिक टंकलेखकांची पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर सैन्य सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांमधून भरण्यात येणार असून इच्छुकांनी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लिपिक टंकलेखक पदासाठी उमेदवारांकडे मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ३० शब्द व इंग्रजी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ४० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच सैन्य सेवेचा अनुभव व पात्रतादेखील गृहीत धरली जाईल. अर्जासोबत सैन्य सेवेतील पीपीओ, डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, मराठी व इंग्रजी टंकलेखनाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीस पत्राद्वारे, ईमेलद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी अर्ज सादर करण्याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

Pune

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !

भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!

Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण

संबंधित लेख

लोकप्रिय