पुणे : आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना हिरडा नुकसानभरपाई देण्याविषयी शासनाने काढलेल्या दि. १२ मार्च २०२४ रोजीच्या शासननिर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी आज (दि.५ जुलै) गावागावात निर्धार प्रतिज्ञा घेऊन, हिरडा उत्पादक एकजूट दाखवतील. त्यानंतरही शासनाला जाग आली नाही तर ऐन श्रावण महिन्यात गावोगाव आंदोलनास सुरुवात होईल. असा इशारा किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (Hirda Crop)
जून – २०२० साली निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या हिरडा नुकसानीची भरपाई देण्याविषयी राज्यशासनाने दि. १२ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय काढला आहे; परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. या शासन निर्णयाची अंमबजावणी होऊन, हिरड्याची नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी. यासाठी आंबेगाव, जुन्नरमधील हिरडा उत्पादक शेतकरी यांनी येत्या शुक्रवारी (दि. ५) गावागावात निर्धार प्रतिज्ञा घेऊन, हिरडा उत्पादकांची एकजूट दाखवतील, असे आवाहन किसान सभेच्या पुणे जिल्हा समितीने केलेले आहे. (Hirda Crop)
हिरडा नुकसानभरपाई देण्याविषयी – शासनाने काढलेल्या दि.१२ मार्च २०२४ रोजीच्या शासननिर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास, ऐन श्रावण महिन्यात आंदोलनास सुरुवात होईल, असे किसान सभेचे पदाधिकारी डॉ. अमोलवाघमारे, राजू घोडे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकरी, लक्ष्मण जोशी, आमोद गरुड, रामदास लोहकरे, विकास भाई, संतोष कांबळे यांनी सांगितले.
हेही वाचा :
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर
धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत
ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी
सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली
धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ
ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची