Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सभा

PCMC : सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सभा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा बुधवारी (दि. 8) सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची तोफ धडाडणार आहे. या सभेची जोरदार तयारी सुरु असून महाविकास आघाडीच्या या महासभेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. pcmc news

शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरून, बाळासाहेब ठाकरेंचे नाव चोरून आणि पारंपारिक निशाणीवर दावा सांगून गद्दारी केलेल्यांना त्यांची योग्य जागा दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने संजोग वाघेरे पाटील यांच्या स्वरूपामध्ये एक प्रामाणिक, सजग आणि जनमानसातील प्रश्नांची जाण असणारे उमदे उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ बुधवार (दि. 8) सायंकाळी सहा वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सी. पी. आय. (एम),आर. पी. आय. (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया असे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे नेते या महासभेमध्ये आपले विचार मांडणार आहेत. pcmc news

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य आमदार जयंत पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, आरपीआय (ए) चे दीपक निकाळजे हे प्रमुख वक्ते आपले विचार मांडणार आहेत.

उद्धव ठाकरे यांना जनमानसातून मिळणारा पाठिंबा राज्यभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. वयाची ऐंशी उलटून देखील संघर्ष योद्धा आधारवड शरद पवार हे अक्षरशः पायाला भिंगरी लावून महाविकास आघाडीचा (Mahvikas aghadi) प्रचार करत आहेत. जयंत पाटील यांचे आक्रमक भाषण नेहमीच विरोधकांच्या उरात धडकी भरवत असते. पृथ्वीराज चव्हाण यांचे अनुभवी प्रगल्भ आणि मुद्देसूद भाषणाला विरोधकांकडून एक टक्का देखील प्रत्युत्तर मिळत नाही. संजय सिंह आणि दीपक निकाळजे यांची सडेतोड भाषणे यावेळी होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना देखील महाविकास आघाडीच्या धडाडणाऱ्या तोफांचे आवाज ऐकण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने सर्व पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच तमाम नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

संबंधित लेख

लोकप्रिय