Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याST Bus Accident: 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात

ST Bus Accident: 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात

ST Bus Accident : छत्रपती संभाजीनगर मध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील अजिंठा घाटात एसटी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी (ST Bus Accident) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसमधून तब्बल 66 प्रवासी प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस पुणे ते रावेर प्रवास या मार्गावरुन ही बस धावत होती. अजिंठा घाटात येताच, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी (ST Bus Accident) होऊन अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बस मध्ये तब्बल 66 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशात आता पुन्हा अजिंठा घाटात बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. बस रस्त्यावरुन खाली घसरल्याने पलटी होवून बसचेही मोठे नुकसान झाले आहे. बसच्या पुढील व पाठीमागील बाजूच्या काचा फुटल्या असून टायरही निखळल्याचे दिसून येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मतदकार्य सुरू केले. अपघातामधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी अजिंठा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर, काही जणांना खासगी रुग्णालयाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

ब्रेकिंग : सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉफ्टर क्रॅश

MPSC च्या रखडलेल्या तारखांबाबत मोठी अपडेट, वाचा !

मोठी बातमी : राहुल गांधींना या मतदार संघातून उमेदवारी जाहीर

‘हिंदू विधि झाले नसल्यास ते लग्न ग्राह्य धरले जाणार नाही’ सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

कोरोना लसीचे साईड इफेक्ट; लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला, चर्चेला उधान

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

संबंधित लेख

लोकप्रिय