Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यपालघर : आरोग्य विभागातील रिक्त 498 पदे ताबडतोब भरून, ऑक्सिजन उपलब्धता 60...

पालघर : आरोग्य विभागातील रिक्त 498 पदे ताबडतोब भरून, ऑक्सिजन उपलब्धता 60 टन करावी – आमदार विनोद निकोले

डहाणू : पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकूण रिक्त असलेली 498 पदे ताबडतोब भरून जिल्ह्यातील ऑक्सिजन उपलब्धता किमान 60 मेट्रिक टन पर्यंत करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री, राज्यमंत्री, सचिव, पालघर जिल्हाधिकारी व पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन ई-मेल द्वारे पाठवून केली आहे.

यावेळी आ. निकोले म्हणाले की, पालघर जिल्ह्याला सागरी, डोंगरी व ग्रामीण अशी वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना लाभली आहे. या जिल्ह्यात सागरी किनारा लाभलेला डहाणू, पालघर, वसई हे तालुके तसेच औद्योगिक दृष्ट्या विकसित असा वाडा व पालघर तालुका तसेच अतिदुर्गम डोंगरी भाग असलेला जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी हे तालुके असे एकूण 08 तालुके आहेत. पालघर जिल्ह्यात कोरोना कोविड – 19 विषाणू चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअर्थी आपल्या सर्वांना एकत्र येऊन जनहितार्थ उपयोजनात्मक अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. 

ज्याअर्थी दिवसेंदिवस पालघर जिल्ह्यातील कोरोना कोविड – 19 चे रुग्ण वाढ आहेत त्यानुसार ऑक्सिजनची आवश्यकता वाढत आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यास किमान 60 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा तातडीने उपलब्ध करून द्यावा. तसेच पालघर जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत एकूण 602 पदे मंजूर आहेत, पैकी भरलेली पदे 382 आहेत. तर प्राथमिक माहितीनुसार 220 पदे रिक्त आहेत. त्याअर्थी कोविड – 19 चा प्रादुर्भाव पाहता पालघर जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत रिक्त पदे तातडीने भरावीत.

त्याचबरोबर माझ्या प्राथमिक माहिती अनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकूण मंजूर पदे 897 असून त्यापैकी 619 पदे भरलेली आहेत. तर रिक्त असलेली पदे 278 आहेत. त्या 278 पैकी एकूण सेवा वितरण पदे 202 तर एकूण गोदाम पदे 76 अशी आहेत. असे सर्व मिळून आरोग्य विभागात अंतर्गत येणारी एकूण 498 पदे ताबडतोब प्रशासनाने भरावीत अशी मागणी आ. निकोले यांनी केली आहे. तसेच “सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कार्यालयाकडून आपल्याला ई-मेल प्राप्त झाला असून पुढील योग्य कार्यवाही करता पाठविला आहे.” असे कळविण्यात आले आहे, असे आ. निकोले म्हणाले.


संबंधित लेख

लोकप्रिय