Wednesday, February 28, 2024
Homeजुन्नरजुन्नर तालुक्यातील 135 दिव्यांग लोकांचे अंंत्योदय राशन कार्ड करीता पुरवठा विभागात अर्ज...

जुन्नर तालुक्यातील 135 दिव्यांग लोकांचे अंंत्योदय राशन कार्ड करीता पुरवठा विभागात अर्ज दाखल

जुन्नर : तालुक्यातील दिव्यांग लोकांना सवलतीचे धान्य व शासनाच्या विविध योजना चा लाभ मिळावेत या करीता श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप च्या वतीने जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना शासनाच्या जिआर नुसार 21 प्रकारचे दिव्यांग, विधवा, निराधार दुर्धर आजारग्रस्त  लोकांना आंतोदय राशन कार्ड वर सवलतीचे दर महिन्याला साखर व 35 किलो धान्याचा लाभ दिला जातोो. तसेच शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळतो, अश्या लाभापासून जे लोक वंचित आहेत अश्या जुन्नर तालुक्यातील अनेक दिव्यांग, विधवा, निराधार, दुर्धर आजार ग्रस्त, अनाथ लोकांना अंंत्योदय राशन कार्डमध्ये समावेश करून लाभ दयावा म्हणून तहसीलदार रवींद्र सबनिस यांना भेटून सविस्तर चर्चा केली.

या दिव्यांग लोकांना जुन्नर तालुक्यात रोजगार व नोकरी लवकर मिळत नाही. तालुक्यात कोणतेही कंंपनी नसल्याने रोजगार मिळत नाही, रोजगार नसल्याने मुलांचे शिक्षण व दवाखान्याचे खर्च महागाईच्या काळात परवड नाही व अनेक वेळा वेळा शासनाच्या योजना लवकर भेटत नाही‌. संजय गांधी चे अनुदान 3 ते 4 महिना उशीरा भेटते. तसेच कोरोना काळात अनेक लोकांनचे घर उध्दवस्त झाले (कर्ता पुरूष) गेलेत. सध्याच्या काळात महागाईच्या मुळे लोकांना बाहेरचे धान्य परवड नाही. त्यामुळे अश्या लोकांना शासनाच्या विविध योजना व सवलतीचे धान्य मिळावे म्हणून श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण च्या वतीने तालुक्यातील दिव्यांग, विधवा व वंचित लोकांनचे अंंत्योदय राशन कार्ड चे फार्म भरून घेतले. ते आज जुन्नर तहसील कार्यालय पुरवढा विभागातील गोपाळ ठाकरे, पुरवठा  अ .का. (S.A.K.) याची भेट घेवून सर्व अंंत्योदय राशन कार्ड लवकर मिळावेत व सवलतीचे धान्य मिळावेत म्हणून जुन्नर तालुक्यातील 135 अर्ज सादर केले.

यावेळी रवींद्र सबनिस, तहसीलदार व ठाकरे यांनी सर्व अर्ज छाननी करून जे लोक योजनेत बसतील त्याना लवकरच अंंत्योदय योजनेत समावेश करून लाभ दिला जाईल. जसे मागील वर्षात 350 दिव्यांग लोकांना लाभ दिला. तसेच या लोकांना पण लाभ मिळून देवू असे आश्वासन दिले.

या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अरुण शेरकर अध्यक्ष, सुनिल जंगम, सौरभ मातेले, गोरक्ष नरविर, मंगेश भुजबळ, संध्या भुजबळ, लक्ष्मण घोगरे उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरूण शेरकर यांनी तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना जुन्नर तालुक्यातील सर्व दिव्यांग व वंचित लोकांनच्या अडचणी सोडवण्यात व लाभ मिळून देण्यासाठी नेहमी सहकार्य करतात या बद्दल आभार धन्यवाद मानले.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय