Saturday, July 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सुमधुर गीतांच्या मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

PCMC : सुमधुर गीतांच्या मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : विविध भारती म्युझिकल इव्हेंट आयोजित ‘एक प्यार का नगमा हैं’ या हिंदी – मराठी लोकप्रिय सुमधुर गीतांच्या विनामूल्य मैफलीत गुरुवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहात रसिक मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सामाजिक कार्यकर्ते सचिन शेटे, सुचिता शेटे, दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन साठे, उपाध्यक्ष संतोष बाबर, संचालक महेंद्र चिंचवडे, प्रसन्न वंजारी, राजू भिंगारे, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, आनंद मुळूक, आयोजक गीता कोसंदर, नितीन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कराओके पार्श्वसंगीताच्या तालावर “एक प्यार का नगमा हैं…” , “दिल की नजर सें…” , “जिंगल बेल…” , “निंद ना मुझको आये…” , “ये हवा मेरे संग संग चल…” , “हसता हुआं नुरानी चेहरा…” , “सासोंकी जरुरत हैं…” , “ये दोस्ती हम नहीं छोडेंगे…” , “ही पोरगी साजूक तुपातली…” अशा हिंदी – मराठी लोकप्रिय गीतांच्या बहारदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. काही द्वंद्वगीतांना रसिकांनी ‘वन्स मोअर’ची फर्माईश करीत उत्स्फूर्त टाळ्यांची दाद दिली. अनिल जंगम, सोमा बोस, दैवशाला घाटगे, भाविका साबणे, राजेश किबीले, नेताजी पाटील, शुभांगी पवार, नंदकुमार कांबळे, अरुण सरमाने या सहभागी गायक कलाकारांना शैलेश घावटे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या दरम्यान विविध भारती म्युझिकल इव्हेंट या संस्थेच्या वतीने रिअल लाईफ रिअल पीपल संचालित सावली निवारा केंद्र या संस्थेला आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली. संस्थेचे व्यवस्थापक गौतम थोरात, सामाजिक कार्यकर्ते अग्नेश अमृस फ्रान्सिस, लाभार्थी सुनील जोशी यांनी मदतनिधी स्वीकारला. त्यानंतर उद्योजक उमाकांत पवार, नवनाथ कोलते, अन्वर पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पैठणीचा लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये सानिका कांबळे, साक्षी भिंगारे, अक्षदा यादव या भाग्यवान विजेत्या ठरल्या.

अनिल घाटगे, विनायक कदम, नंदकुमार कांबळे यांनी मैफलीच्या संयोजनात परिश्रम घेतले. लटके आणि जगद्गुरू गायकवाड यांनी रंगमंच सजावट केली; तर तुषार कदम यांनी छायाचित्रण केले. अरुण सरमाने यांनी निवेदन केले.

Mahaegs Maharashtra Recruitment
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय