Saturday, July 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित नागरी समस्या पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत...

PCMC : नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित नागरी समस्या पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहीन – रोहन चव्हाण

रोहन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीरात 7 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी

तरुणांनी रचनात्मक सामाजिक कार्य केल्यावर लोकमान्यता मिळते-कामगार नेते युवराज पवार

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
: चिखली जाधववाडी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्या 22 व्या वाढदिवसानिमित्त चिखली जाधववाडी येथील सिल्व्हर स्काईज सोसायटी चव्हाण चौक येथे भव्य प्रांगणात (दि.२७ नोव्हेंबर) महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व आजी कै.सुभद्राबाई दत्तू चव्हाण यांचे स्मरण करून करण्यात आले.



आरोग्य शिबिरात 7683 नागरिकांची तपासणी


मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील नामवंत तज्ञ डॉक्टरांच्या एकूण चार टीम मार्फत या महाआरोग्य शिबिरात नेत्र,दंत,ह्रदयविकार,रक्तदाब,मधुमेह,थायरॉईड आदी लहान बालके,महिला,वृद्ध यांची तपासणी करण्यात आली.2234 लोकांची डोळे तपासणी करून 1052 लोकांना मोफत चष्मे,284 दंत चिकित्सा व ह्रदयाशी संबंधित 47 ईसीजी व 212 बीएमडी टेस्ट आदी तपासणी करण्यात आली,578 तरुण तरुणींनी रक्तदान केले.एकूण 3176 लोकांची सर्वसाधारण चिकित्सा करण्यात आले. चिखली जाधववाडी, कुदळवाडी सह मोशी परिसरातील बहुतांश श्रमिक गोरगरिब व विविध हौसिंग सोसायट्यांमधील उचभ्रू कामगार कर्मचारी परिवार मोठ्या संख्येने आरोग्य शिबीर व अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित होता.



व्यासपीठावर मान्यवरांनी कौतूक केले

आरोग्य शिबिराच्या समारोपानंतर रोहनदादा युवा मंच व चिखली जाधववाडी येथील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी अभिष्टचिंतन सोहोळ्याचे आयोजन केले होते. व्यासपीठावर जेष्ठ वारकरी संप्रदायाचे ह.भ.प.जयंत महाराज जाधव यांनी आशीर्वाद दिले, ते म्हणाले आजची तरुण पिढी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात नेतृत्व करू इच्छित नाही. तरुणाई चंगळवादी जीवनात व्यस्त आहे. आपली वारकरी संप्रदायाची शिकवण व संस्कृती समाजासाठी किमान त्याग करा, वंचित घटकांना मदत करा, असे सांगते, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी तसेच सामाजिक ऋण फेडण्यासाठी तरुणाई कार्यरत राहते.रोहन दादा यांनी येथील नागरी समस्या सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे,त्यांनी मावळ मधील दुर्गम आदिवासी लोकांना मदत केली आहे.


पिंपरी चिंचवड कामगार संघटनेचे अध्यक्ष तरुण कामगार नेते युवराज पवार म्हणाले की, रोहन चव्हाण यांनी अतिशय तरुण वयात उद्योग व्यवसायात प्रगती केल्याचा आढावा घेताना यामुळे रोहन चव्हाण लोकप्रिय आहेत.तरुणांनी रचनात्मक सामाजिक कार्य केल्यावर लोकमान्यता मिळते,आज शहरात तरुणाईने सामाजिक व राजकीय नेतृत्व केले पाहिजे असे युवराज पवार यांनी म्हटले.

शेतकरी आठवडे बाजारामुळे युवकांना संधी प्राप्त करून दिली

भोर येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल गाडे यांनी रोहन चव्हाण यांनी सुरू केलेल्या शेतकरी आठवडे बाजाराचा उल्लेख करताना सांगितले की, रोहन चव्हाण यांचे सामाजिक कार्य तरुणांना प्रेरणा देत आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा भाजीपाला,फळे,फुले येथील शहरी नागरिकांना उत्तम दर्जाची किफायतशीर दरात मिळावी यासाठी त्यांनी शेतकरी आठवडे बाजार वर्षांपूर्वी सुरू केला,हा अभिनव कृषी संजीवनी उपक्रम युवकांना फायदेशीर ठरला आहे.



चिखलीतील मान्यवर सामाजिक व कामगार क्षेत्रातील कार्यकर्ते नेते माजी नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते रवी जांभुळकर अर्जुन जाधव, युवा नेते विशाल जाधव, विशाल बालघरे, विशाल आहेर, नितीन आहेर, भगवान मूळे ईई मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


रोहन चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांचे रोहनदादा चव्हाण युवा मंचच्या टीमचे आभार व्यक्त केले, ते म्हणाले की, नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित नागरी समस्या पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहीन,आपल्या परिसरातील परिसर स्वच्छ राहण्यासाठी तसेच विविध सोसायट्यामधील नागरिकांच्या नागरिसमस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत राहीन.असे आश्वासन दिले या सोहोळयाचे सूत्रसंचालन दत्तात्रय तरटे यांनी केले.
.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय