Tuesday, May 21, 2024
Homeग्रामीणअलमट्टीतून ४६१३० क्युसेक तर कोयनेतून २२२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु; ११ बंधारे...

अलमट्टीतून ४६१३० क्युसेक तर कोयनेतून २२२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु; ११ बंधारे पाण्याखाली.

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १४४.७७ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४५०, कोयना धरणातून २२२२ तर अलमट्टी धरणातून ४६१३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे असे एकूण ११ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ४५.१६ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ८७.७३७ इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ५१.०६ दलघमी, वारणा ५५२.७२ दलघमी, दूधगंगा ४४३.६८ दलघमी, कासारी ४३.९३ दलघमी, कडवी ३६.९४ दलघमी, कुंभी ४५.६५ दलघमी, पाटगाव ६९.१३ दलघमी, चिकोत्रा २०.७७ दलघमी, चित्री २४.४६ दलघमी, जंगमहट्टी २०.१५ दलघमी, घटप्रभा  ४४.१७ दलघमी, जांबरे २३.२३ दलघमी, कोदे (ल पा) ६.०६ दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम २०.५ फूट, सुर्वे २०.२ फूट, रुई ४८.९ फूट, इचलकरंजी ४६ फूट, तेरवाड ४१.६ फूट, शिरोळ ३३ फूट, नृसिंहवाडी २७ फूट, राजापूर १६.९ फूट तर नजीकच्या सांगली ८.६ फूट व अंकली ९.२ फूट अशी आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय