Sunday, May 19, 2024
HomeNewsworld record एका भारतीय मूर्तीकाराने जगातील सर्वात छोटा चमचा तयार केलाय, लांबी...

world record एका भारतीय मूर्तीकाराने जगातील सर्वात छोटा चमचा तयार केलाय, लांबी माहितीय किती

तुम्ही तांदळाच्या दाण्यावर नाव लिहून देणारे पाहीले असतील, अशा प्रकारचे छंद बाळगूण अनेक जण नवा पायंडा पाडत असतात. राजस्थानच्या एका मूर्तीकाराने तर एक नवीनच जागतिक विक्रम केला आहे.
या पट्ट्याने आपल्या बॉल पेनाच्या निपच्या आकाराचा लाकडी चमचा तयार केला आहे. हा चमचा पाहण्यासाठी तुम्हाला डोळ्यांना त्रास द्यावा लागेल. कारण हा लाकडी चमचा इतका छोटा आहे की तुम्हाला भिंगाची गरज लागेल.

राजस्थान जयपूरचे नवरतन प्रजापती यांनी जगातला सर्वात छोटा चमचा तयार करण्याचा विश्वविक्रम केला आहे. हा चमचा त्याने लाकडापासून तयार केला आहे. या चमच्याची दखल गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. हा चमचा आपल्या बॉलपेनच्या निपच्या लांबीचा आहे. या विश्वविक्रमी लाकडी चमच्याची लांबी अवघी 2 एमएम इतकी लहान आहे. त्यामुळे तुम्हाला त्यास पहाण्यासाठी भिंगाची गरज लागेल इतका तो लहान आहे.

यापुर्वी जगातला सर्वात लहान लाकडी चमचा तेलंगणा येथील गौरीशंकर गुम्माडीढला यांनी 2021 मध्ये तयार केला होता. त्याची लांबी 4.5 एमएम इतकी होती. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याची दखल घेतली आहे. या विश्वविक्रमी लाकडी चमचा तयार करण्याचा व्हीडीओही सोशल मिडीयावर तयार करण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय