Saturday, May 18, 2024
Homeबॉलिवूडवाकडेतिकडे चाळे करून तुम्ही डान्स केला तर येणाऱ्या पिढीवर काय संस्कार होतील...

वाकडेतिकडे चाळे करून तुम्ही डान्स केला तर येणाऱ्या पिढीवर काय संस्कार होतील ? छोट्या पुढारीने गौतमी पाटील हिला सुनावलं

पुणे / प्रतिनिधी : “छत्रपती शिवाजी महाराज हे बाई वाचवणारे होते नाचवणारे नव्हते हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. छोटा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतो की, वाकडेतिकडे चाळे करून तुम्ही डान्स केला तर येणाऱ्या पिढीवर काय संस्कार होतील?नव्या पिढीला वाटेल की असे वाकडेतिकडे चाळे करून डान्स केला तर फार फेमस होतं. त्यामुळे नवी पिढी त्याकडे आकर्षित होईल आणि त्याप्रमाणे वागेल”, असं छोटा पुढारी घनश्याम दराडे म्हणाला.

“छोटा पुढारी म्हणून सांगतो की, गौतमी पाटील असेल किंवा आणखी कोणी, असे वर्तन करणे आम्ही खपवून घेणार नाही. त्याला सुट्टी नाही. माझा गौतमी ताईंना विरोध नाही. मात्र डान्स करण्याच्या पद्धतीमुळे गर्दी होते. ती पद्धत त्यांनी बदलावी. गौतमी ताईंना महाराष्ट्रावर कायम क्रेज टिकून ठेवायचे असेल तर चांगला कार्यक्रम, चांगला डान्स करावा लागेल. गौतमी ताईंनी तरुणांचा आकर्षण न राहता महाराष्ट्राचा आकर्षण राहावं तेवढं कर्तृत्व त्यांच्यामध्ये आहे”, अस देखील छोटा पुढारी घनश्याम दराडे म्हणाला.

“विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाषणात सांगितले की गौतमी पाटलांना बोलवा. त्यात चुकीचे काही नाही. महाराष्ट्रात सध्या सबसे कातील गौतमी पाटील ही फेमस आहे. त्यामुळे उरसामध्ये गौतमी पाटीलला बोलवा असे अजित दादा म्हणाले. अजितदादा कुठेही चुकीचं किंवा वाईट बोललेले नाहीत. त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नये. गौतमी पाटलांवर मी फेमस होण्यासाठी टीका करतोय असे काही तरुणांनी मला कमेंटमध्ये म्हटले. मात्र मला तसे करायची गरज नाही. कारण जेव्हा गौतमी पाटलांचा ट्रेंड नव्हता तेव्हा महाराष्ट्रात छोटा पुढाऱ्याचा ट्रेंड होता”, असं छोटा पुढारी घनश्याम दराडे म्हणाला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय