Sunday, May 19, 2024
Homeबॉलिवूडसुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन

(मुंबई) :- सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि गेल्या ४० वर्षांपर्यंत अनेक मोठ्या अभिनेत्रींना डान्स शिकविणाऱ्या सरोज खान यांचे आज निधन झाले. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसापूर्वी आजारी पडल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु, ती निगेटीव्ह आली होती. त्या ७२ वर्षांच्या होत्या.

       सरोज खान यांनी माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी सह अनेक सुपर स्टारला डान्स शिकवला होता. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना १७ जून रोजी वांद्रे येथील गुरूनानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण आज पहाटे त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.

     त्यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सरोज खान यांनी सुमारे २००० च्या वर गाण्यांना कोरिओग्राफ केले आहे. यात मिस्टर इंडिया (१९८७) तील हवा हवाई, तेजाब (१९८८) मधील एक दो तीन, बेटा (१९९२) मधील धक धक करने लगा, देवदास (२००२) मधील डोला रे डोला या गाण्यांचा समावेश आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय