Sunday, March 16, 2025

कामगार संघटनांंचा देशव्यापी संप; डाव्या आघाडीची बिंदू चौकात निदर्शने.

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कामागर संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला डाव्या आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली.

देशातील ४४ कामगार कायदे बदलण्याची घाट केंद्र सरकारने घातलेला आहे, कामागारांचे प्रश्न गंभीर होत नाही असताना सरकार कामगारांनाच देशोधडीला लावायला निघाले आहे. त्याविरोधात देशातील कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. याला डाव्या आघाडीचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत यादव म्हणाले.

यावेळी बोलताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नामदेव गावडे म्हणाले की, देशातील कामगार, कष्टकरी, शेतकरी सर्व त्रस्त असून कोडीवच्या आड कामगारांवरील हल्ले तीव्र झाले आहेत. या सरकारच्या दुप्पटी भूमिकेचा डावी आघाडी निषेध करते. आशा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांचे प्रश्न गंभीर झालेले आहेत. त्या विरोधात सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे.

यावेळी भाकपचे जिल्हा सेक्रेटरी सतिशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, रमेश वडणगे, अरूण लाटकर, युथ फेडरेशनचे गिरीश फोंडे, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवनाथ मोरे, युथ फेडरेशनचे दिलदार मुजावर, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे प्रशांत आंबी, सागर पाटील आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles