Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जनभूमी साहित्य ,कविता – पाहिजे असे कुणीतरी, कवी – समीर

---Advertisement---



पाहिजे असं कुणीतरी आयुष्यात…


---Advertisement---

पाहिजे असं कुणीतरी आयुष्यात,

आयुष्याला समजून घेणारी.

रोज नाही पण ?

कधीतरी आठवणीनं मॅसेज करणारी.

पाहिजे असे कुणीतरी तुझ्यासारख,

प्रेमाला समजून घेणारी.

नावाने नाही पण ?

शिव्या देऊन प्रेमानं आवाज देणारी.

पाहिजे असं कुणीतरी प्रत्येक संकटात साथ देणार,

मनातल्या भावना समजून घेणारी.

शब्दांनी नाही तर ?

अश्रूंनी स्वतःच्या भावना व्यक्त करणारी.

---Advertisement---

पाहिजे असं कुणीतरी रोज उशीरा पर्यंत जागल्यावर ओरडणारी,

आणि तीच रात्री उशिरापर्यंत जागवणारी.

सुख नाही तर ?

दुखः ही वाटून घेणारी.

पाहिजे अस कुणीतरी,

भांडण झालं तरी आपली काळजी घेणारी.

कितीही भांडलो तरी नातं सांभाळणारी.

क्षणभर नाही तर ?

आयुष्यभर साथ देणारी.

पाहिजे अस कुणीतरी,

प्रत्येक संकटात साथ देणारी.

वेळ पडल्यास ओरडणार आणि त्याच आपुलकीने समजून घेणारी.

रस्त्यावरच्या वाटेन नाही तर  ?

आयुष्याच्या वाटेनं शेवटपर्यंत सोबत चालणारी.



कवी – समीर

पत्ता – पंचाळे खुर्द ता.आंबेगाव जि. पुणे 

संपर्क – ९१६८१९२८२३/९४२३७८७०८२


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles