Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकष्टकऱ्यांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयाचे स्वागत - आशा कांबळे

कष्टकऱ्यांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयाचे स्वागत – आशा कांबळे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्रातील तीन करोड असंघटित कामगार कष्टकरी जनतेसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने 28 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर केला आहे, या निर्णयाचे , कष्टकरी कामगार पंचायत,घरकाम महिला सभा, कष्टकरी जनता आघाडी, वतीने स्वागत करण्यात आले असून पिंपरी येथे कष्टकरी महिला पुरुषाने एकत्र येऊन एकमेकाला पेढे भरवत या निर्णयाचे स्वागत केले असून महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदन केले आहे, अशी माहिती घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे यांनी दिली.


बाबा कांबळे यांच्या लढ्याला यश मिळाले आहे


देशभरातील 45 कोटी व संघटित कामगार कष्टकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा व्हावा, त्यांना म्हातारपणी पेन्शन मिळावे आधी मागण्यासाठी कष्टकरी कामगार पंचायत, कष्टकरी जनता आघाडी वतीने कष्टकऱ्यांची नेते बाबा कांबळे यांचे नेतृत्वाखाली गेल्या वीस वर्षापासून सातत्याने पाठपुरवठा संघर्ष व रस्त्यावर लढाई सुरू आहे, यासाठी कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली मुंबई नागपूर येथे अधिवेशन काळामध्ये मोर्चा आंदोलन देखील करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगार कष्टकऱ्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा आज केली असून या निर्णयाच्या आम्ही स्वागत करत असून कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या लढायला यश आले असून या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील तीन कोटी व संगत कामगार कष्टकऱ्यांना होणार आहे यामध्ये शेतमजूर वीत भट्टी कामगार साफसफाई काम करणाऱ्या महिला घरकाम करणाऱ्या महिला, फळभाजी विक्रेत्या महिला पुरुष व आधी कष्टकरी जनतेला होणार आहे.

कष्टकऱ्यांची नेते बाबा कांबळे यांचे नेतृत्वाला हा लढा आज यशस्वी झाला असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सरकारकडे पाठपुरावा करून या कायद्याची व कल्याणकारी मंडळाचे यशस्वी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आशा कांबळे यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार, शहराध्यक्ष संतोष गुंड, रवींद्र लंके, सुरेश सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, शुभम तांदळे, संदीप कुरुंद, सोपान पवळे, कष्टकरी जनता आघाडीच्या मधुराताई डांगे सह कष्टकरी महिला उपस्थित होत्या.

‘ट्रॅक कंपोनन्ट्स’च्या कामगारांना तब्बल साडेबारा हजारांची वेतनवाढ !


ज्येष्ठ नागरिक त्रिवेणीनगर संघाचा 14 वा वर्धापन दिन संपन्न


संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

संबंधित लेख

लोकप्रिय