Saturday, April 27, 2024
Homeजिल्हापुण्यात विकेंड लॉकडाऊन : पर्यटनासाठी गेलात तर १५ दिवस क्वारंटाइनचे आदेश काढू...

पुण्यात विकेंड लॉकडाऊन : पर्यटनासाठी गेलात तर १५ दिवस क्वारंटाइनचे आदेश काढू अजित पवार यांचा इशारा

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही, असे असताना पुण्यात निर्बंध शिथील केल्यानंतर नागरिक शनिवारी आणि रविवारी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, खोपोली अशा पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी १५ दिवस क्वारंटाइन करण्याचा इशारा दिला आहे.

अजित पवार म्हणाले की, पुण्यातील अनेक नागरिक विविध ठिकाणी पर्यटनासाठी जात आहेत, तसेच काही लोक राज्याबाहेर देखील जाऊ लागले आहेत. काही लोक ट्रेकिंगला वैगेरे जात आहेत, त्यामुळे पुण्यातील लोक जे बाहेर गेले होते ते परत आल्यावर त्यांना १५ दिवस क्वारंटाइन करावं लागेल, तसे आदेश काढावे लागतील,” असा इशारा पवार यांनी दिला आहे.

पुण्यात विकेंड लॉकडाऊन

पुण्यातील नागरिक शनिवारी आणि रविवारी पर्यटनासाठी जात आहे तसेच जिल्ह्यातील परिस्थिती बिघडू नये यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी सोमवार ते शुक्रवारच दुकानं सुरु ठेवणार असून शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच परिस्थिती खूप बिघडली तर त्यात बदल करण्यात येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय