Wednesday, September 28, 2022
Homeग्रामीणअकोले तालुक्यात 'एक व्यक्ती, एक झाड अभियान' राबवावे - सुशीलकुमार चिखले

अकोले तालुक्यात ‘एक व्यक्ती, एक झाड अभियान’ राबवावे – सुशीलकुमार चिखले

अकोले, दि. १९ : तालुक्यात एक व्यक्ती एक झाड अभियान राबवावे, अशी संकल्पना राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अकोले तालुकाअध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी तालुक्यातील पदवीधर, शेतकरी, नागरिकांना नम्र आवाहन केले आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी आता तालुका प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकून येत्या वटपौर्णिमेपासून (ता. २४) तालुक्यात ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविले जाणार आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभाग याबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग यामध्ये घेतला जाणार आहे.  

वडाच्या रोपांची लागवड :

अकोले तालुक्यातील जनतेने लोकसहभागातून २० हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. येत्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या रोप लागवडीने या अभियानाची सुरुवात होईल.

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट : 

अकोलेत २० हजार किंवा त्यापेक्षाही अधिक झाडे लावण्याचा संकल्प करून निसर्गमय तालुका बनवूया, असेही चिखले म्हणाले.

 

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय