Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडWe together foundation : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बहिणींना सक्षम करणे हे प्रत्येक...

We together foundation : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बहिणींना सक्षम करणे हे प्रत्येक भावाचे कर्तव्य – मधुकर बच्चे

वुई टुगेदर फाउंडेशनचा एक अनोखा रक्षाबंधन उपक्रम (We together foundation)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : रक्षा बंधनच्या निमित्ताने वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने अभिसार फाउंडेशन संचालित वाकड येथील दिव्यांग मुला मुलींसह व शिक्षक वर्गाला मेहंदी काढण्याचा निस्वार्थी निशुल्क उपक्रम घेण्यात आला. (We together foundation)

वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेचे सल्लागार मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने तसेच संस्थेच्या सदस्या मंगला डोळे – सपकाळे यांच्या निस्वार्थी प्रयत्नाने व संस्थेच्या अनेक सभासदांच्या मदतीने हा एक वेगळा व मुलांना आनंददायी उपक्रम घेण्यात आला.

या वेळी वुई टुगेदर फाउंडेशनचे सल्लागार मधुकर बच्चे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भावाच्या मनगटाभोवती राखी बांधताना ते भावाच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतात. बहिणीचे संरक्षण करण्यासाठी भावाची मनगटे धाग्यांनी बांधली जातात. (We together foundation)

आजच्या काळात आपली प्रत्येक बहिण शिक्षण, आरोग्य सह जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तिला सक्षम करणे हे प्रत्येक भावाचे आद्य कर्तव्य आहे. ज्यांना भाऊ नाहीत, त्या बहिणींना संस्थात्मक कार्यातून मदत करूया, त्यांना साहित्य, कला,शिक्षण ई सर्व स्तरावर मदत देऊ या. एक बहिण शिकली की, दोन्ही घरात समृध्दी येते, खर तर दिव्यांग मुला मुलींना मेहंदी काढणे म्हणजे एक कठीण कसब असते ते सर्वाच्या सहभागाने खूप छान यशस्वी केले. (We together foundation)

मेहंदी काढताना व काढल्यानंतर त्या मुलामुलीच्या चेहऱ्यावर जो आनंद तयार झाला होता त्याचे शब्दात वर्णन करता येणे श्यक्य नाही. अशा भावना मधुकर बच्चे यांनी व्यक्त केल्या.

मेहंदी एक्स्पर्ट आर्टिस्ट पूजा जैन व त्रिशा जैन यांनी अत्यंत उत्कृष्ट तेजस्वी मेहंदी काढण्याचे काम केले. यामध्ये २० दिव्यांग विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यावेळी अभिसार फाउंडेशनचे संचालक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.

संबंधित लेख

लोकप्रिय