Friday, May 17, 2024
Homeआंतरराष्ट्रीयआम्ही भारतातील शेतकरी आंदोलनाच्या सोबत आहोत - ग्रेटा थनबर्ग

आम्ही भारतातील शेतकरी आंदोलनाच्या सोबत आहोत – ग्रेटा थनबर्ग

पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही घेतली शेतकरी आंदोलनात उडी

महाराष्ट्र जनभूमी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहेत. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर तरुण पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे.

ग्रेटा थनबर्ग ही आंतरराष्ट्रीय पर्यावरणादी कार्यकर्ता आहे. जागतिक तापमानात दिवसेंदिवस वाढ होता आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करा, या मागणीसाठी ती लढत आहे. ग्रेटानं ट्विट करत म्हटले आहे की, “आम्ही भारतातील शेतकरी आंदोलनाच्या सोबत आहोत.”

 

 शेतकरी कायद्यांमुळे दिल्लीतील आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. केंद्र सरकार चर्चा करण्याचे सोडून दडपशाहीचे धोरण अवलंबताना दिसत आहे. केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असे स्पष्ट चित्र दिसत आहे. परंतु आंदोलनावर तोडगा निघत नसल्यामुळे आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढत असताना दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं आहे. शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. पाणी, विज, अन्नधान्य आणि इतर सुविधांना रोखण्याचा कुटील डाव सरकार करताना दिसत आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतकरी आंदोलनाला वाढत चालेला पाठिंबा लक्षात घेता, केंद्र सरकार कोणती भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. परंतु शेतकरी नवीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

केंद्र सरकारचा हट्टापायी शेतकरी आंदोलनावर तोडगा निघत असल्याची टिका ही आता होऊ लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं. तेव्हापासून सिंधू, टिकरी आणि गाझीपूर येथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या तथाकथित हिंसाचाराच्या आरोपानंतर शेतकरी आंदोलन आणखी पेटलं आहे. शेतकरी आंदोलनाला वाढता प्रतिसाद पहाता सरकारने माघार घ्यावी, अशीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय