Sunday, May 5, 2024
Homeजिल्हाआशा व गटप्रवर्तकांची परवड थांबणार कधी ? कोरोना प्रोत्साहन भत्त्यासाठी आंदोलन करण्याचा...

आशा व गटप्रवर्तकांची परवड थांबणार कधी ? कोरोना प्रोत्साहन भत्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा

नाशिक : आशा व गट प्रवर्तकांना जून 2020 पासूनचा कोरोना प्रोत्साहन भत्ता 1 हजार रुपये थकीत त्वरित मिळावा, अन्यथा 17 तारखेपासून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) यांच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भातील निवेदन उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे (प्रशासन) यांना देण्यात आले आहे.

संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले म्हणाले, कोविड 19 च्या काळात अल्प मानधन वर कार्यरत आशा व गटप्रवर्तकांनी कठीण काळात गावाची आरोग्य सेवा केली आहे. जिल्हा परिषद नाशिक यांनी ही कामाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत मार्फत 1 हजार रुपये दरमहा आशा व गटप्रवर्तकांना कोरोना संपेपर्यंत द्यावा असे पत्रक काढले आहे. त्याप्रमाणे मे 2020 आपण अंमलबजावणी करावी

थकीत प्रोत्साहन भत्ता मे 2020 पासून त्वरीत द्यावा. प्रत्येक तालुक्यात अतिशय कमी प्रमाणात वरील निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. ज्या ग्रामपंचायत नि प्रोत्साहन भत्ता दिल्या बद्दल आभारी आहोत. मात्र संपूर्ण नाशिक जिल्ह्यात अंमलबजावणी करावी, असेही देसले म्हणाले.

कोरोना योध्या आशा व गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन भत्ता देऊन प्रोत्साहन द्यावे, अन्यथा 17 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषदेवर आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना तीव्र आंदोलन करेल, असेही देसले म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय