Friday, October 18, 2024
Homeताज्या बातम्यामुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य

Vidhansabha Election : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून, 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत या निवडणुकीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा तीव्र होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदावरून एक मोठं वक्तव्य केलं आहे.ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. जयंत पाटील यांनी उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे .सांगली येथील शिवस्वराज्य यात्रेच्या समारोप सभेत बोलताना शरद पवार यांनी जयंत पाटील यांचे कौतुक करत उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी त्यांची मोलाची भूमिका असेल असं जाहीर केलं.

यामुळे महाविकास आघाडीतून जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असतील का, यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या सभेत कार्यकर्त्यांनीही “जयंत पाटील मुख्यमंत्री होणार” अशा घोषणा दिल्या, ज्यावर जयंत पाटील यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत, “मुख्यमंत्रीपद घोषणांमधून मिळत नाही, त्यासाठी मोठ्या मेहनतीची गरज आहे,” असं सांगितलं.

शरद पवारांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकीत जयंत पाटील हे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात मोठे दावेदार ठरण्याची शक्यता आहे.

Vidhansabha Election

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित

सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात आज किंवा उद्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता

बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना अटक, तर फरार आरोपीचा शोध सुरू

आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट

महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा

संबंधित लेख

लोकप्रिय