Friday, October 18, 2024
Homeजिल्हाVasant more : वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली...

Vasant more : वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

Vasant more : लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत गेलेल्या वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर झालेल्या कार्यक्रमात वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधून हाती मशाल घेतली.

वसंत मोरेंसोबत 23 पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे पुण्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. वसंत मोरे (Vasant More) यांच्यासह मनसेचे 17 शाखाध्यक्ष, 5 उपविभाग अध्यक्ष, 1 शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकारी ठाकरे गटात सामील झाले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला रामराम करत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला होता. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ही जागा कॉंग्रेसकडे गेल्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. परंतु, त्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांनी वसंत मोरेंना शिवसेना सोडल्याबद्दल “शिक्षा” दिली. या शिक्षेमध्ये त्यांना पुण्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याची मोठी जबाबदारी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना शिवसेना वाढवण्याची जबाबदारी दिली असून, त्यांनी हा शब्द गंमतीशीर पद्धतीने घेतला तरीही ही जबाबदारी महत्त्वाची आहे असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “वसंत मोरेंसह आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, लोकसभेआधी आम्ही सर्वजण बघत होतो, वसंतराव काय करतात हे बघत होतो. तुम्ही पहिले शिवसैनिक होतात. मधल्या काळात शिवसेनेच्या बाहेर काय वागणूक मिळते, याचा अनुभव घेतला आणि तुम्ही परिपक्व होऊन स्वगृही परतला आहात. त्यामुळे तुमचं महत्त्व, काम आणि जबाबदारी फार मोठी आहे.”

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली असल्याचे सांगून उद्धव ठाकरेंनी आगामी लढाई गद्दारी, धोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्ध असणार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या अस्तित्वाची ती लढाई असणार आहे असेही त्यांनी नमूद केले.

Vasant More

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण

धक्कादायक : भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाचा तिघांवर जीवघेणा हल्ला

Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख

लोकप्रिय