Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणजुन्नर तालुका माध्यमिक DCPS संघाच्या अध्यक्षपदी तुषार आहेर, तर कार्याध्यक्ष पदी प्रफुल्ल...

जुन्नर तालुका माध्यमिक DCPS संघाच्या अध्यक्षपदी तुषार आहेर, तर कार्याध्यक्ष पदी प्रफुल्ल बोऱ्हाडे


जुन्नर
 (आनंद कांबळे) : जुन्नर तालुका माध्यमिक DCPS संघाच्या अध्यक्ष पदी तुषार आहेर तर कार्याध्यक्ष पदी प्रफुल्ल बो-हाडे व सचिवपदी प्रविण ताजणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

DCPS धारक शिक्षकांच्या समस्या व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठी प्रसंगी  संघटनात्मक कार्यातून लढा उभारावा लागला तरी तयार असल्याचे अध्यक्ष तुषार आहेर यांनी निवडी नंतर सांगितले.

तर कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष तुषार आहेर , उपाध्यक्ष गणेश उकुर्डे, बाळकृष्ण लोहकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल बो-हाडे, सचिव प्रविण ताजणे,  सहसचिव धनंजय राजूरकर, खजिनदार सचिन मालेगावकर, सहखजिनदार रतीलाल बागूल, संघटक योगेश शेळके, सहसंघटक हनीफ शेख, प्रसिध्दी प्रमुख मोहन लांडे, महिला प्रतिनिधी वर्षा चौधरी, सुनीता फापाळे, तर सदस्य पदी प्रमोद जाधव,  विश्वास भालिंगे, पी. बी. घुले,  मनोज गाडे, रुपाली आवारी, सुवर्णा नांगरे, भानुदास ढोबळे, एस आर हाडवळे, सारिका हिंगणे आदींची निवड करण्यात आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय