Thursday, May 2, 2024
Homeजिल्हाराजेंद्र भारूड यांच्या समर्थनार्थ आदिवासी संघटना एकवटल्या, खा.हिना गावीत बॅकफूटवर

राजेंद्र भारूड यांच्या समर्थनार्थ आदिवासी संघटना एकवटल्या, खा.हिना गावीत बॅकफूटवर

रत्नागिरी : डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या समर्थनार्थ व नंदुरबार  खासदार हिना गावीत यांच्या विरोधात सर्व आदिवासी संघटना एकवटल्यामुळे हिना गावीत बॅकफूटवर आल्या आहेत. 

बिरसा क्रांती दलाने खासदार हिना गावीत यांच्या विरोधात त्यांच्याच घरासमोर दिनांक 16 मे 2021 रविवार रोजी निषेध आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनाला सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळाला आहे. भाजपा आमदार राजेश पाडवी, तळोदा शहादा मतदारसंघ यांचे वडिल माजी आमदार उदेसिंग कोचरू पाडवी यांनीही खासदार नंदुरबार हिना गावीत यांच्या विरोधात निवेदन दिल्यामुळे हिना गावीत यांची गळचेपी निर्माण  झाली आहे. 

बिरसा क्रांती दलासोबत भिलीस्थान टायगर सेना नंदुरबार, जयस- जय आदिवासी युवा शक्ती, युवा वर्ग-ऑल इंडिया/ भारत, वीर बिरसा मुंडा संघटना नंदुरबार , वीर एकलव्य आदिवासी संघटना विदर्भ, एकलव्य आदिवासी संघटना तळोदा, बिरसा ब्रिग्रेड सातपुडा विभाग, ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन गडचिरोली, ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन रत्नागिरी, पावरा समाज संघ महाराष्ट्र, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद भंडारा, आदिवासी विद्यार्थी संघटना नंदुरबार, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उत्तर महाराष्ट्र, बिरसा क्रांती दलाची जिल्हा व तालुका 25 शाखा, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन भंडारा, भिलीस्थान टायगर सेना तळोदा या आदिवासी संघटनांनी निवेदन देऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय