Saturday, April 27, 2024
Homeग्रामीणसुरगाणा : आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन तर्फे कोविड जननिधीस आर्थिक मदतीचा हात

सुरगाणा : आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन तर्फे कोविड जननिधीस आर्थिक मदतीचा हात

सुरगाणा (दौलत चौधरी) : आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन नाशिक, सुरगाणा तालुका मित्र परिवार यांच्याकडून सुरगाणा तालुका कोविड -१९ जन निधी या खात्यावर रक्कम रुपये ५१,००१ रुपयांची आर्थिक मदतीचा धनादेश पदाधिकारी यांनी तहसीलदार किशोर मराठे यांच्याकडे रक्कम धनादेशाद्वारे सुपुर्त करण्यात आली. 

आधार मैत्री फाउंडेशनने एक हात मदतीचा पुढे करीत  लोकसहभागातून लोकहिताकडे या संकल्पनेतून अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. यामध्ये सुरगाणा येथे मोफत वाचनालाय, अभ्यासिका, रोंघाणे येथील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून हेमलता वार्डे या विद्यार्थिनीला गोळा फेक करीता गोळा, स्पर्धा परिक्षेकरता जनरल नॉलेज, पोलीस भरती, गणित, व्याकरण आदी पुस्तके मदत दिलेली आहेत. तसेच मृत्यांच्या नातेवाईकांच्या कुटुंबाला आर्थिक सहायता केली आहे. अशा प्रकारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

“आदिवासी समाजातील असलेले नोकरदार वर्ग,  आर्थिक दृष्टीने सक्षम असलेले यांनी समाज हित डोळ्यासमोर ठेवून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील हुशार, होतकरु विद्यार्थांना प्रोत्साहन  देण्यासाठी तसेच लोकहिताची कामे करण्यासाठी एकत्र आले आहेत. यामधून संघ भावना तयार होऊन समाजहिताकडे वाटचाल करता येईल हाच उद्देश आहे.”

– रतन धुम

– अध्यक्ष आदिवासी आधार मैत्री फांउडेशन नाशिक

यावेळी आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन उपाध्यक्ष डॉ.मधुकर पवार, खजिनदार मनोहर गांगुर्डे, सदस्य डॉ. दिनेश चौधरी, विनायक चौधरी, लिलाधर चौधरी, हरेराम गायकवाड, राणा चौधरी, चंद्रकांत खंबाईत, यशवंत देशमुख, माणिक खंबाईत, लक्ष्मण बागुल आदि उपस्थित होते.

तसेच कोविड मदत निधी संकलनास प्रोत्साहन  देऊन प्रयत्न करणारे शिक्षक रतन चौधरी, ग्रामसेवक वसंत भोये, रामभाऊ थोरात, भगवान आहेर, मंगलदास गवळी, एकनाथ बिरारी, प्रशांत हिरे आदि उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय