Tuesday, May 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवाहतुकीचे नियम सर्वांसाठी फायद्याचे आहेत, नागरिकांनी सहकार्य करावे - वरिष्ठ पोलिस निरक्षक...

वाहतुकीचे नियम सर्वांसाठी फायद्याचे आहेत, नागरिकांनी सहकार्य करावे – वरिष्ठ पोलिस निरक्षक डॉ.अमरनाथ वाघमोडे

चिखली, तळवडे वाहतूक पोलिसांना रेनकोटचे वितरण

आम आदमी महिला आघाडी अध्यक्षा सीता ताई केंद्रे यांचा उपक्रम

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: सध्या पावसाळा सुरू झाला असून शहरात विविध ठिकाणी वाहतूक नियमन व नियंत्रण करताना अत्यावश्यक सेवा मधील वाहतूक नियंत्रण विभागावर खूप ताण आहे.सतत पडत असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पावसात भिजत कर्मचारी वाहतूक नियमन करत आहेत. चिखली, कुदळवाडी, तळवडे येथील वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचाऱ्यांना आम आदमी पार्टी महिला आघाडी व संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट, चिखली जाधववाडी च्या अध्यक्षा सीता केंद्रे यांनी मोई फाटा, तळवडे कॅनबे चौक व कुदळवाडी येथील पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण केले. मान्सूनचा सामना करत रस्त्यावर उभे राहून विविध चौकात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांप्रती सद्भावनेचे प्रतीक म्हणून रेनकोट वितरण वितरण करण्यात येत आहे, असे सीताताई केंद्रे यांनी सांगितले.


मोई फाटा, कॅनबे चौक, कुदळवाडी येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी आम आदमी पार्टीचे वैजनाथ शिरसाट, प्रकाश हगवणे, माया सांगवे, आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तळवडे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की, वाहतूक नियमन करताना नागरिकांचे सहकार्य अतिशय महत्वाचे असते. वाहतुकीचे नियम हे सर्वांसाठी फायद्याचे आहेत,शहरात प्रशस्त रस्ते असूनही वाहतूक कोंडी होत आहे. रहदारीचे नियमन करताना नागरिकांनी वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्यास रस्ते सुरक्षा दर्जेदार होईल असे सांगितले.


रस्त्यावरील 60 टक्केहून जास्त अपघात मानवी चुकांमुळे होतात. वाहने वापरताना इतरांना कोणताही त्रास होणार नाही, किंवा नोकरी, व्यवसाय व्यतिरिक्त किरकोळ कामासाठी दुचाकी,चारचाकी वाहने वापरून आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण करत आहोत का, याचा विचार करून नागरिकांनी वाहतूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश नलावडे यांनी केले आहे.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश नलावडे, सहाय्यक फौजदार भिसे, पोलिस हवालदार बोटे, पोलिस हवालदार झांबरे, पोलिस हवालदार धुमाळ, म पो ना शेलुकर, पो ना घुले, पोलिस शिपाई माने, पोलीस शिपाई कोल्हे, पोलीस शिपाई देशमुख, वार्डन नवले, वार्डन आलूरे गार्डन मोहिते सह आम आदमी पक्षाचे वैजनाथ शिरसाट,प्रकाश हगवणे,माया सांगवे,बालाजी कांबळे,दत्तात्रय सांगवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा :

भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार माहिती आहेत का? तर ‘हे’ आमदार सर्वात गरीब…यादी पहा !

पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड

ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’

डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’

हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे

सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय