Saturday, October 5, 2024
Homeग्रामीणआज पेट्रोल पंप चालकांचा संप , पेट्रोल पंपा बाहेर रांगा !

आज पेट्रोल पंप चालकांचा संप , पेट्रोल पंपा बाहेर रांगा !

मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Prices) मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी गरज म्हणून नागरिकांना त्याची खरेदी करावी लागते. मात्र पेट्रोल पंप चालकांच्या आंदोलनमुळे इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आरोग्य : पहिल्यांदा सेक्स करताना या 8 गोष्टी ठरतील लाभदायक !

पेट्रोल आणि डिझेलवरील कमिशन वाढवण्यासाठी आज देशभरातील सुमारे 70 हजार पेट्रोल पंप तेल कंपन्यांच्या विरोधात उतरले आहेत. या पेट्रोल पंपांच्या मालकांनी 31 मे रोजी ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून (OMCs) पेट्रोल आणि डिझेल खरेदी न करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात वाढ केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्या प्रचंड नफा कमवत आहेत, मात्र डीलर्सच्या कमिशनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, असे पंपमालकांचे म्हणणे आहे. मंगळवारी देशातील 24 राज्यांमधील सुमारे 70 हजार पेट्रोल पंप मालक ओएमसीच्या कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीविरोधात आंदोलन करत आहेत.

त्यांनी कंपन्यांकडून एक दिवस तेल न घेण्याचे जाहीर केले आहे. ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही राज्यांतील पेट्रोल डीलर संघटनांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग जैन म्हणाले की, या आंदोलनाचा किरकोळ विक्री आणि ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. पेट्रोल पंपावर दोन दिवसांचा साठा आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर : मानवतावादाचा दीपस्तंभ !

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात 517 पदांसाठी भरती, 1 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय