Friday, May 17, 2024
Homeजिल्हाहिना गावीत यांच्या विरोधात कुठल्याही परिस्थितीत आंदोलन होणारच, आंदोलनाचे निवेदन...

हिना गावीत यांच्या विरोधात कुठल्याही परिस्थितीत आंदोलन होणारच, आंदोलनाचे निवेदन तहसीलदार धडगाव यांना सादर

नंदुरबार : हिना गावीत खासदार नंदुरबार यांच्या विरोधात बिरसा क्रांती दलाचे निषेध आंदोलन हे कुठल्याही परिस्थितीत होणारच आहे. असे बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष रोहित पावरा यांनी सांगितले आहे. आज नायब तहसीलदार धडगाव बी.एस.आहिरे यांना निवेदन देण्यात आले .यावेळी जिल्हा अध्यक्ष रोहित पावरा, मंगलसिंग पावरा, बिरसा क्रांती दल तालुका उपाध्यक्ष धडगाव, शिवाजी पावरा, किसन पावरा हे उपस्थित होते.  

हे आंदोलन दिनांक 16 मे 2021 रोजी दुपारी 2.00 वाजता हिना गावीत खासदार नंदुरबार यांच्या घरासमोर होणार आहे. निवेदनाची प्रती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधिक्षक नंदूरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांना पाठविली आहे. 

निवेदनात म्हटले म्हटले आहे की, नंदुरबारच्या खासदार हिना गावीत ह्या जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्या विरोधात खोटे आरोप करीत विनाकारण बदनामी करणारे रोज नवीन नवीन विडीओ बनवून सोशल मिडीयावर टाकत आहेत.एका कर्तव्य दक्ष अधिका-याला सुडबुद्धीने वारंवार वेठीस धरून संपूर्ण जिल्हा प्रशासनाला हिना गावीत बदनाम करीत आहेत. कोरोना काळात जिल्हा प्रशासनाचे काम उत्तम रित्या चालू असताना जिल्हाधिकारी नंदुरबार व इतर अधिका-यांवर बिनबुडाचे आरोप करत सोशल मीडीयावर विडीओ टाकून व वृत्तपत्रात खोट्या बातम्या देऊन नंदुरबार जिल्ह्याचे वातावरण खराब करीत आहेत. “नंदुरबार बना देश का मिसाल, कलेक्टर हो तो ऐसा” अशा बातम्या देशभर फिरत असून देशभर राजेंद्र भारूड कलेक्टर नंदुरबार यांच्या ऑक्सीजन प्लांट व कोरोना नियंत्रण आणण्याच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

सुपरस्टार फिल्म अभिनेता अजय देवगण, अमिर खान, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव सिताराम कुंटे, हिंदी न्यूज, मराठी न्यूज व इंग्रजी न्यूज चॅनेल वाले सुद्धा राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. सोशल मिडीवरही राजेंद्र भारूड यांच्या कामाची प्रशंसा लाखो प्रेक्षक करत आहेत. एवढेच नाही तर मा.उच्च न्यायालयाने सुद्धा  कोरोनाबाबतच्या नंदुरबार जिल्ह्यातील कामाचे कौतुक केले आहे. अशा कौतूकस्पद वातावरणात  हिना गावीत खासदार नंदुरबार ह्या राजेंद्र भारूड यांच्यावर खोटे आरोप करून जिल्हाधिकारी यांच्या मनाचे खच्चीकरण करत आहेत. जिल्हाधिकारी यांना कामात साथ द्यायचे सोडून त्यांची पाये खेचण्याचे काम करत आहे.राजेंद्र भारूड यांच्या सरकारी  कामात वारंवार  अडचणी निर्माण करत आहेत. म्हणून आम्ही हिना गावीत खासदार यांचा जाहीर निषेध करतो. एका लोकप्रतिनिधींनी कोरोना सारख्या या संकटकाळी जिल्हा प्रशासनाला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मदत करायचे सोडून नंदुरबार कलेक्टर यांचे मनोबल वाढविण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम खासदार हिना गावीत करीत आहेत. ही मोठी दुर्दैवाची व लाजीरवाणी बाब आहे. 

नंदुरबार सारख्या एका आदिवासी जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी ऑक्सीजन प्लांट तयार  करून संपूर्ण देशसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. ही नंदुरबार साठी व आदिवासींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु हिनाताई गावीत ह्या कलेक्टर राजेंद्र भारूड यांचे कौतूक करायचे सोडून समाजमाध्यमात बदनामी करत आहेत. राजेंद्र भारूड यांची ऑक्सीजन प्लांटबाबत थापेबाजी, ऑक्सीजन प्लांटबाबत खोट्या बातम्या व खोटी माहिती,नंदुरबार मध्ये ऑक्सीजनचा तुटवडा आहे वगैरे खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय