Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडविरोधी पक्षाचे I.N.D.I.A या नावाविरुध्द याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

विरोधी पक्षाचे I.N.D.I.A या नावाविरुध्द याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली – विरोधी आघाडीला INDIA असे नाव देण्याविरोधातील जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. INDIA हे नाव वापरणे बंद करण्याची मागणी जनहित याचिका द्वारे केली होती. जनतेचे लक्ष वेधून घेणे हे लक्ष ठेऊन अशी याचिका सादर करण्यात आल्याचा न्यायालयाचा निष्कर्ष आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने याचिका स्वीकारण्यास नकार दिला.

रोहित खेरीवाल यांनी ही याचिका दाखल केली होती. खंडपीठाने याचिकेवर विचार करण्यास नकार दिल्याने तक्रारदाराने याचिका मागे घेतली. 26 विरोधी पक्षांच्या युतीला INDIA हे नाव देण्यात आले आहे.

त्याचवेळी समान आरोप ठेवून गिरीश भारद्वाज यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयाने विरोधी पक्षांना व निवडणूक आयोगाला नोटिस बजावले आहे.मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा व न्या.अमित महाजन यांच्या डिव्हिजन बेंचने ही नोटीस बजावली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय