Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमैला पाणी शुद्धीकरण पंपाचा पाईप तुटला; दूषित सांडपाणी पवना नदीत, प्रशासनाचे दुर्लक्ष

मैला पाणी शुद्धीकरण पंपाचा पाईप तुटला; दूषित सांडपाणी पवना नदीत, प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी चिंचवड : काकडे पार्क, केशवनगर, चिंचवडगाव मधील नदी किनारी जलनिसरण पंपिंग सेंटर मध्ये गेल्या २० दिवसांपासून बहुतेक पाईप तुटल्यामुळे प्रभागातून येणारे ड्रेनेज चे पाणी २० दिवस झाले उघड्यावरून वाहत आहे. या पम्पिंग स्टेशन शेजारी पालिकेची जिम, हॉल आहे व फूट बॉल ग्राउंड आहे. सकाळी व रात्री नागरिक मोठ्या प्रमाणात चालण्यासाठी येतात.

ड्रेनेज पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदरचे पाणी हे नदीत जात असणार हे निश्चित म्हणजे नदीही प्रदूषित होतेय. याबाबत तक्रारी देऊन सुद्धा आरोग्य विभाग टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी केला आहे.

ते म्हणाले की, सारथी हेल्पलाईन, आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे. २० दिवसांपासून अनेक नागरिकांनी सदर ठेकेदाराने, देखरेख करणाराने सदरची तक्रार अनेक वेळा केले असल्याचे सांगितले, अजून दखल घेतली नाही ही गंभीर बाब आहे. सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता भयानक परिस्थिती दिसली. आम्ही अनेक ठिकाणी फोन करून कळविले. परंतु, फक्त टोलवाटोलवी केली जात असल्याचे लक्षात आले.

प्रसासनाच्या ढिसाळ व निष्काळजी पणामुळे जिम, फुटबॉल व फिरण्यास येणाऱ्या व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे, ही गंभीर बाब आहे. सदर काम तातडीने झाले पाहिजे. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. नागरिकांच्या वतीने पाहणी करून फोटो आणि व्हीडिओ माहितीसाठी प्रशासनाकडे पाठवले आहेत. मैलामिश्रित सांडपाणी पवना नदीत प्रक्रिया न करता जात आहे, तसेच ते परिसरात आरोग्याची समस्या निर्माण करत आहेत. या पंपिंग स्टेशनची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मनपाचा आरोग्य विभाग किंवा पर्यावरण विभाग नेमकी कोणाकडे आहे. याबद्दल प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी टाळत आहे, असा आरोप मधुकर बच्चे यांनी केला आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय