Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक शहर अधिवेशन उत्साहात संपन्न

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक शहर अधिवेशन उत्साहात संपन्न

कम्युनिस्ट पक्षाच्या नाशिक शहर सचिवपदी तल्हा शेख यांची निवड

नाशिक
: रविवारी दि.२१ ऑगस्ट २०२२ रोजी शहरातील द्वारकापरिसरातील खरबंदा पार्क येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक शहर अधिवेशन पार पडले. अधिवेशनात शहर सचिव म्हणून तल्हा शेख, सहसचिव म्हणून राहुल अढांगळे व कैलास मोरे यांची निवड करण्यात आली.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन दर तीन वर्षांनी घेण्यात येत असते, अधिवेशनात मागील ३ वर्षांच्या कालावधीत पक्षाने केलेल्या कामाचा अहवाल सादर करून त्यावर टीका व आत्मटीका करून, बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाची भूमिका ठरवताना पक्ष संघटनेत आवश्यक ते बदल करत लोकशाही मार्गाने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन ऑक्टोबर महिन्यात आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे होणार असून त्या अगोदर राज्य, जिल्हा, शहर व तालुका पातळीवर पक्ष अधिवेशने घेण्यात येत आहेत. त्या धर्तीवर भा.क.प नाशिक शहर अधिवेशन कॉ. दत्ता देशमुख सभागृह, खरबंदा पार्क, जानकी प्लाझा, द्वारका येथे आयोजित करण्यात आले, भाकप राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडले.

मावळते शहर सचिव कॉ. महादेव खुडे यांनी अधिवेशनाचे प्रास्ताविक केले, तसेच मागील ३ वर्षामध्ये पक्षाच्यावतीने आणि पक्षासोबत संबंधित असलेल्या जन संघटनांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा सविस्तर अहवाल सादर केला. संघटनात्मक अहवालात तसेच राजकीय अहवालातील अपुऱ्या बाबींवर प्रकाश टाकताना उपस्थित प्रतिनिधींनी त्यात भर घातली, येऊ घातलेल्या महानगर पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाच्या रणनीतीवर उपस्थित प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त केले. अधिवेशनाशेवटी सर्वानुमते १५ सदस्यीय शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अधिवेशनात शहर सचिव म्हणून कॉ.तल्हा शेख यांची तर सहसचिव म्हणून राहुल अढांगळे, कैलास मोरे, संघटक पदी भीमा पाटील, पूनमचंद शिंदे तर खजिनदार म्हणून प्राजक्ता कापडणे यांच्या समवेत सदस्य म्हणून दिनेश वाघ, एस.आर.खतीब, मनोहर पगारे, पद्माकर इंगळे, रामदास भोंग, राजू देसले, महादेव खुदे व विराज देवांग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ राजू देसले यांनी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. पक्षाच्या कामात नाशिकमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल बोलतांना भाकप नाशिक हे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व जिल्ह्यांसाठी एक आदर्श मॉडेल म्हणून उभा राहील, नाशिक जिल्ह्यात पक्षाच्या सर्व जनसंघटना कार्यरत आहेत. यातून पक्ष बांधणी मजबूत करून मनपा, तसेच जिल्हा परिषद निवडणूक ला सामोरे जाऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला. केंद्रीय पक्षाच्या ठरावानुसार पक्षात अधिकाधिक युवकांना प्राधान्य देण्याचे ठरले असताना ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) चे जिल्हा समन्वयक कॉम्रेड तल्हा शेख यांची वयाच्या २५ व्या वर्षी शहर सचिवपदी निवड झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ.राजू नाईक, कॉ.व्ही.डी.धनवटे, नाशिक जिल्हा सहसचिव कॉ.दत्तू तुपे, कॉ एम. आर. खतीब, विराज देवांग आदी पदाधिकारी मनोगत वेक्त केले.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय