Tuesday, May 21, 2024
Homeकृषीदूध दराबाबत बैठक निष्फळ ठरली; संघटनांकडून मोठी घोषणा

दूध दराबाबत बैठक निष्फळ ठरली; संघटनांकडून मोठी घोषणा

मुंबई : राज्य शासनाने २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परिपत्रकेप्रमाणे सहकारी व खाजगी दूध संघ दूध उत्पादकांना दर देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु आजच्या बैठकीत याबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याने आजची बैठक निष्फळ ठरली.

त्यामुळे शेतकरी नेते डॉ. अजित नवले, सदाभाऊ खोत तसेच इतर संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी या शासन परिपत्रकाची सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे होळी केली. तसेच येत्या २४ नोव्हेंबरला राज्यभर या शासन परिपत्रकाची होळी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

याबाबत बोलताना डॉ.अजित नवले म्हणाले, दुग्धविकास मंत्र्यानी दूध संघ, दूध कंपन्या व शेतकरी प्रतिनिधींची दुध दराबाबत बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. सरकारने काढलेला दूध दर आदेश दूध कंपन्यांनी धुडकावून लावला आहे. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ३४ रुपये दर देण्यास नकार दिला आहे. सरकारच्या आदेशाची अशी अवहेलना होत असताना सरकार आजच्या बैठकीत केवळ गुळमुळीत सारवासारव करताना दिसले. सरकारच्या आदेशाची किंमत रद्दीची असल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे. असे रद्दी शासनादेशाची २४ नोव्हेंबर रोजी दूध संकलन केंद्रांवर राज्यभर शेतकऱ्यांनी होळी करावी व विविध मार्गाने आंदोलन तीव्र करावे असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ.‌अजित नवले म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय