Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमराठा आरक्षण लढा भावीपिढ्यांच्या मुक्तीचा लढा – अमोल भालेकर 

मराठा आरक्षण लढा भावीपिढ्यांच्या मुक्तीचा लढा – अमोल भालेकर 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : राज्यातील बहुतांश मराठा कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांच्या आत असून ७६ टक्के कुटुंब शेती किंवा शेतमजुरी करून कुटुंबाची उपजीविका चालवतात. सुमारे ७३ टक्के मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. मागील २० वर्षात शेती करणारा मराठा तरुण तुटपुंज्या शेतीमाल उत्पन्नामुळे गावे सोडून शहराकडे नोकरी व्यवसाय शोधात अस्थिर जीवन जगत आहे. सरकारी-निमसरकारी नोकरीत मराठ्यांचे प्रमाण केवळ ६ टक्के असून राज्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्याही अधिक असल्याने नमूद करतानाच आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा सर्वच आघाडय़ांवर मराठा समाजात विपन्नावस्था आहे. सत्ताधारी वर्गात आलटून पालटून मराठा पुढारी राज्यकर्ते झाले तरीही सकल मराठा समाजासाठी त्यांनी कोणतेही योगदान दिलेले नाही. त्यामुळे मराठा आरक्षण मागणीचा लढा हा मराठा समाजाच्या भावी पिढ्याच्या मुक्तीचा लढा आहे, अशी परखड भूमिका रुपीनगर, तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल भालेकर यांनी बंदला पाठिंबा देताना स्पष्ट केली आहे. The Maratha reservation fight is the fight for the liberation of future generations

पिंपरी चिंचवड बंद चे समर्थन करताना रुपीनगर, तळवडे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मागणी आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यास पाठिंबा दिला.

यावेळी विशाल मानकरी, किरण गाढवे, शरद भालेकर, धनंजय भालेकर, भाऊसाहेब काळोखे, श्रद्धा देशमुख, सागर चव्हाण, श्रीकांत भालेकर, मच्छिंद्र शेळके, दादा तांबे, रामचंद्र भालेकर, रामदास कुटे, प्रवीण व्होके, पिंटु पवार, यश विटकर, नितेश शिंदे आदी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन बंदचे समर्थन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय