Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआंब्याच्या जातीला दिले "या" महान क्रिकेटरचे नाव

आंब्याच्या जातीला दिले “या” महान क्रिकेटरचे नाव

पुणे : उत्तर प्रदेशातील लखनऊजवळच्या मलिहाबाद हे जेमतेम २० हजार लोकसंख्या असेलेलं गाव आंबा शेतीसाठी (Mango Farming) प्रसिध्द आहे. या गावामध्ये हजारो आंब्यांची झाडे आहेत. या गावाजवळच भारत सरकारचे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टीकल्चर (Central Institute Of Subtropical Horticulture) ही संशोधन संस्था आहे.

या संस्थेच्या परिसरातच एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाबद्दलची माहिती या संस्थेला नव्हती. तब्बल ८२ वर्षे वयाच्या या शेतकऱ्याचे नाव आहे कलिमउल्लाह खान. (Kalimullah Khan)

एकाच आंब्याच्या झाडाला कलम करून ३०० प्रकारची विविध चवीची, आकाराची आणि सुवासाची फळे येतात, ही किमया कलिमउल्लाह खान यांनी करून दाखवली आहे. कलिमउल्लाह यांनी कलमिकरणाद्वारे आंब्याच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत. त्यातीलच एका आंब्याच्या जातीला त्यांनी क्रिकेट विश्वातला तारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचे नाव दिले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय