Thursday, November 21, 2024
HomeNewsजातीयवादा विरोधात लढाई हीच शरद यादव यांना श्रद्धांजली-बाबा आढाव

जातीयवादा विरोधात लढाई हीच शरद यादव यांना श्रद्धांजली-बाबा आढाव

पुणे दि.१९-”जातीयवाद्यांची कपटनीती ओळखून,त्यांना वेळीच रोखणे,हीच दिवंगत शरद यादव यांना,श्रध्दांजली ठरेल.” असे आवाहन डॉ बाबा आढाव यांनी केले आहे.
माजी केंद्रीयमंत्री शरद यादव यांच्या,श्रध्दांजली सभेत प्रमुख वक्ते म्हणून,बोलताना डॉ.आढाव यांनी वरील आवाहन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघडीचे नेते वसंत साळवे होते.

पुढे बोलताना आढाव म्हणाले की,विषमता पराकोटीला गेली आहे.विचारवंत निष्क्रिय बनून,बघ्याची भूमिका घेत आहेत.त्याचबरोबर आढाव यांनी,राखीव जागांचा लाभ घेऊन,मध्यमवर्गीय बनलेल्या,सुस्त वर्गावरही टीका केली.घर-घर संविधान,ही संकल्पना राबविताना,प्रतिज्ञेतला भारत बनविण्याचं,आव्हान आपल्यासमोर असल्याचं प्रतिपादन त्यांनी केले.’मनुस्मृतीला हटवा,देश वाचवा’ यासाठी सत्याग्रहाचा विचार करावा लागेल.असा इशारा संविधानवाद्यांना त्यांनी दिला.

अध्यक्ष स्थानावरुन बोलताना वसंत साळवे यांनी,फुले-गांधी-आंबेडकर यांच्याशिवाय,वंचितांच्या चळवळीचं वर्तुळ पूर्ण होऊ शकणार नसल्याचे सांगितले.दिवंगत शरद यादव यांचे सहकारी,प्रा विकास देशपांडे यांनी,यादवांच्या आठवणी सांगताना,त्यांच्या व्याख्यानातील,उपरोधक गुणांचा उल्लेख केला.कामगार नेते नितीन पवार यांनी सांगितले की,दिवंगत शरद यादव यांचे कार्यच आम्ही,पुढे नेत आहोत.त्यात सातत्य ठेवणे हीच,त्यांना आदरांजली ठरेल.

समाजवादी पक्षाचे अनिस अहमद यांनी,कर्पुरी ठाकूर,मुलायमसिंग यादव आणि शरद यादव यांच्या कार्याचा गौरव केला.त्यांचे कार्य पुढे चालू ठेवणे, हेच आव्हान आपल्यासमोर असल्याचं सांगितलं.मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ शमशुद्दीन तांबोळी यांनी,पूर्वी “इस्लाम खतरेमे हैं” अशा आरोळ्या ऐकू येत होत्.आता उलटा प्रचार सुरु झाला असून,”हिंदू खतरेमे हैं” अशा घोषणा सुरु झाल्याचे प्रतिपादन केले.

सर्व पक्षीय श्रध्दांजली सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक तांबे,जनता दलाचे दत्ता पाकीरे,राष्ट्र सेवा दलाचे संजय गायकवाड,छात्र भारतीच्या दिपाली आपटे यांनीही आपले,मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा आढाव यांनी, “क्रांती झिंदाबाद रहेगी,क्रांती झिंदाबाद” या वीर गीताने केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जेष्ठ विधिज्ञ मोहन वाडेकर यांनी केले.कार्यक्रमास सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय