Thursday, March 28, 2024
HomeNewsमिळकत कर वसुली करिता पाणी पुरवठा तोडण्याची कारवाई बेकायदेशीर!

मिळकत कर वसुली करिता पाणी पुरवठा तोडण्याची कारवाई बेकायदेशीर!

पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशन आणि चिखली मोशी हाउसिंग फेडरेशनची मनपाला कायदेशीर नोटीस
जारी

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
:महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाला वारंवार विनंत्या करून झाल्या.त्यांना कायदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. पण पिंपरी चिंचवड मनपाच्या करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना ते समजत नाही. तरीदेखील सोसायट्यांमधील काही सदस्यांनी टॅक्स भरला नाही म्हणून पिंपरी चिंचवड मनपाकडून पूर्ण सोसायटीचा पाणीपूरवठा बंद केला जाईल अशा नोटिसाचे सोसायट्यांना वाटप करणे चालू आहे.हे सोसायटीधारकांच्यावर दबाव आणून मानसिक त्रास देणे हे अमानवीय व बेकायदेशीर आहे. अगोदरच सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नाही.त्यातच जर पिंपरी चिंचवड मनपा सोसायट्यांचे पाणी कट करून आमच्या मूलभूत अधिकारांच्यावर गदा आणणार असेल तर ते कदापी सहन केले जाणार नाही.

याबाबत मनपाला त्यांचे कर वसुलीचे अधिकार आणि नागरिकांचे मूलभूत हक्क याविषयी कायदेशीर समज देणारी नोटीस हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी वकिलामार्फत पाठवली आहे.सदर नोटिसमध्ये सूचित करण्यात आले आहे की,सोसायटीमधील मिळकत कर थकीत सदनिका धारकाला मनपाचे स्वतंत्र नळ जोड नसते.सोसायटी कॉमन नळ कनेक्शन मार्फत अंतर्गत पाणी पुरवठा वाहिनीतून संबंधित सदस्याला पाणी पुरवत असते.त्यामुळे त्या मिळकत कर थकबाकीदाराकडून करवसुली साठी सोसायटीचा पाणी पुरवठा तोडण्याची करवाई विसंगत आहे.

कर थकबाकीदार किंवा सोसायटीचे देणे थकीत असलेल्या सदस्याचे पाणी तोडण्यासाठी न्यायालयाने कोणालाही एकतर्फी अधिकार दिलेले नाहीत.कारण पाणी हा मूलभूत अधिकार आहे.सोसायटीतील मिळकत कर थकबाकीदार सदस्याकडे थकबाकी वसुलीसाठी संपूर्ण सोसायटी व्यवस्थापनास मनपा वेठीस धरू शकत नाही.

मनपाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाचे अधिकार आपल्या हातात घेऊ नयेत.असे कायदेशीर नोटीस मध्ये स्पष्ट म्हटले आहे. या कायदेशीर नोटीसीने जर कोट पिंपरी चिंचवड मनपाच्या करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्याचे डोके ठिकाणावर आले नाही, तर पिंपरी चिंचवड मनपात जाऊन खूप मोठे आंदोलन केले जाईल. व यांना नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणला म्हणून कोर्टात खेचले जाईल.

संजीवन सांगळे-अध्यक्ष-चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय