संस्मृती प्रकाशनतर्फे आमदार लांडगेंसह बंधुंचा श्रावणबाळ पुरस्काराने सन्मान
प्रा.मोरे प्रेक्षागृहातील सोहळ्यात ‘दावडी ते रामधाम’या आत्मकथेचेही प्रकाशन
पिंपरी चिंचवड : माझ्या आई-वडिलांनी केलेला संघर्ष आणि त्याग आमच्या कुटुंबियांच्या यशात महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या संस्कारामुळेच आम्हा भावंडांच्या जीवनाला दिशा मिळाली. मी पैलवान होण्यापासून ते आमदार होईपर्यंत आजपर्यंत वडीलांच्या आज्ञेत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार राजकीय जीवनात कार्यरत आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे जागतिक आनंदाच्या शाळेचे “संस्मृती प्रकाशन” च्या वतीने ‘दावडी ते रामधाम’ या सैनिक रामभाऊ दगडु सातपुते यांच्या आत्मकथेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ‘श्रावणबाळ ’पुरस्काराने आमदार महेश लांडगे, बंधू सचिन आणि कार्तिक लांडगे यांचा सन्मान करण्यात आला.
“या” महिन्यात सरकारी विभागात कुठे कुठे होणार भरती, वाचा एका क्लिकवर
यावेळी आमदार लांडगे यांचे वडील किसनराव लांडगे, आई हिराबाई लांडगे, इंटरनॅशनल लाईफ कोच व प्रकाशक विनय सातपुते, ह.भ.प. दिगंबर ढोकले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशक विनय सातपुते म्हणाले की,संस्मृती प्रकाशन चे मुख्य उद्दिष्ट -मुलांनी आई वडिलांवर एक चरित्र ग्रंथ लिहावा व पुस्तकरूपी श्रावणबाळ व्हावे, असे आमची भावना आहे. प्रत्येकाने आयुष्यात असे काहीतरी करावे की आपल्या आत्मचरित्रावर एक एक सुपरहिट चित्रपट व प्रेरणादायी चित्रपट तयार करता येईल असे आवाहन करीत ही संकल्पना समाजात रुजावी या साठी संस्थेतर्फे ‘श्रावणबाळ’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मेगा भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी
ओबीसी युवक-युवतींच्या कौशल्य विकासाकरिता राज्य सरकारचे एक पाऊल, पहा !
कामगार नेते सचिन लांडगे आणि उद्योजक कार्तिक लांडगे यांनीसुध्दा आपले मनागत व्यक्त केले. ह.भ.प दिगंबर ढोकले यांनी ‘समाज व माता-पिता’ या विषयावर प्रबोधन केले. प्रा. माधवी पोफळे यांनी सूत्रसंलन केले. आनंदयात्री विनय सातपुतेंनी आभार मानले व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
आमदार महेश लांडगे भावूक…
प्रत्येक माणसाने आपल्या आई-वडीलांचा आदर केला पाहिजे. समाजिक क्षेत्रात काम करीत असताना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मात्र, आई-वडिलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा श्रावणबाळ पुरस्कार माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा आहे. एखाद्या कार्यक्रमाला आई-वडील उपस्थित रहावेत आणि त्यांच्या मुलांचा असा सन्मान व्हावा, ही फार भाग्याची गोष्ट आहे, अशा मनोगत व्यक्त करीत असताना आमदार लांडगे भावूक झाले होते.
– क्रांतिकुमार कडुलकर
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज
मेगा भरती : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये तब्बल 922 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !