Thursday, February 20, 2025

बावी गावचे सुपुत्र राजकुमार सत्यवान मोरे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त !

बावी :  तालुका माढा जिल्हा सोलापूर गावचे सुपुत्र राजकुमार सत्यपाल मोरे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर जिल्हा पालक मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते सपत्निक सन्मानित करण्यात आले.

जिल्हा परिषद सोलापूर सामान्य प्रशासन विभाग 2 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत दरवर्षी दोन ऑक्टोबर रोजी आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबाबत प्रत्येक तालुक्यातील एक ग्रामविकास अधिकारी अथवा ग्रामसेवक यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कार याकरिता निवड केली जाते. मागील तीन वर्षांमध्ये गठीत केलेल्या स्वतंत्र समितीमार्फत आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारासाठी राजकुमार सत्यपाल मोरे हे पात्र ठरले होते. 

त्याअन्वये आज दिनांक 13 5 2022 रोजी सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले गेले. हा पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण गावामध्ये राजकुमार मोरे यांचे कौतुक होत आहे.

“या” महिन्यात सरकारी विभागात कुठे कुठे होणार भरती, वाचा एका क्लिकवर

मेगा भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Related Articles

- Advertisement -

Latest Articles