Friday, May 17, 2024
Homeराज्यपुणे रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ, पोलिसांनी दिली 'ही' माहिती

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ, पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती, मात्र बॉम्ब शोधक नाशक पथकाने तपासणी केली असता ही संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचे समोर आले.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरात बॉम्बसदृश वस्तू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर खबरदारी म्हणून तात्काळ प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले. तसेच, बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड पथकही घटनास्थळी दाखल झाले. काही काळासाठी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली होती. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.

“या” महिन्यात सरकारी विभागात कुठे कुठे होणार भरती, वाचा एका क्लिकवर

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “आज सकाळी साडेदहा वाजता रेल्वे पोलीस स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित वस्तू स्फोटक किंवा स्फोटकांसारखं मटेरियल देखील नाही. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. पुढील तपास करत आहोत. असे त्यांनी सांगितले.

दरम्यान चार ते पाच दिवसांपूर्वी पुणे नियंत्रण कक्षात पुणे रेल्वे परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकीचा कॉल आला होता. मात्र नंतर तो फेक कॉल असल्याचं समोर आलं. त्यानंतर आज पुणे रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ उडाली होती.

मेगा भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय