Saturday, October 12, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीदेशातील पहिलेच सावित्री पथक महाराष्ट्रातून सुरू !

देशातील पहिलेच सावित्री पथक महाराष्ट्रातून सुरू !

 

नागपूर: एक शिकलेली महिला संपूर्ण कुटुंबाला आणि परिणामी संपूर्ण समाजाला सुशिक्षित बनवते याच उक्तीचा अवलंब करून महिलांना वाहतूक नियमांबाबत जागृत करणे. रस्त्यावरती होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागातील महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवड करून सावित्रीदेशातील पहिलेच सावित्री पथक महाराष्ट्रातून सुरू ! पथक तयार करण्यात आले असून आज महिला दिनाच्या औचित्याने देशातील पहिलीच महिला सुरक्षा आणि रस्त्यावरील अपघात रोखनारी यंत्रणा महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन तयार केली आहे.

या प्रकल्पाचा एक उद्देश म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षण, त्याची अंमलबजावणी ,वाहतूक सुरक्षा बद्दल जनजागृती आणि निरंतर सेवा हा आहे.

शाळा ,कॉलेज ,मॉल ,सोसायट्यांमध्ये जाऊन हे पथक महिलांना वाहतुकी संदर्भात तसेच रस्त्यावरील होणाऱ्या अपघातात बाबत योग्य ते मार्गदर्शन करेल. शिवाय वाहना बाबत तांत्रिक ज्ञान ,वाहनांशी संबंधित विविध कागदपत्रे, यांची पूर्तता तसेच वाहतुकीचे नियम सांगणार आहेत. सोबतच महिलांना रोजगार केंद्र व राज्याच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी मदतशील ठरणार आहे.

या योजनेची संकल्पना शहरातील प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भोयर यांची आहे  या पथकांमध्ये विविध अधिकाऱ्यांसह कर्मचारी सामाविष्ट आहेत . त्यामध्ये वाहतूक अधिकारी मंजुषा भोसले यांचा समावेश आहे

संबंधित लेख

लोकप्रिय