Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहापुरुषांची जयंती नाचून नव्हे तर पुस्तके वाचून साजरी करावी-कॉम्रेड गणेश दराडे

महापुरुषांची जयंती नाचून नव्हे तर पुस्तके वाचून साजरी करावी-कॉम्रेड गणेश दराडे

मावळ/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१४-संत तुकाराम नगर,सुदुंबरे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीउत्सव साजरा करण्यात आला. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आकाश शिंदे यांच्या हस्ते यावेळी कॉम्रेड गोदुताई परुळेकर वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांना अभिवादन करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांनी सांगितले की, या दोन्ही महापुरुषांच्या जीवनातील आदर्श विचारांचा वारसा डोळ्यापुढे ठेऊन तरुण पिढीने आपल्या जीवनात यशस्वी वाटचाल करावी.मोबाईल व सोशल मीडियाच्या काळात वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी तरुणांनी वेळ द्यावा.त्यामुळे जीवनात वैचारिक परिवर्तन होईल.महापुरुषांची जयंती नाचून नव्हे तर आम्ही पुस्तके वाचून साजरी करून साजरी करावी.

अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.अमोल वाघमारे उपस्थित होते.त्यानी आदिवासीच्या बोली भाषेवर संशोधन करून लिहिले पुस्तकं वाचनालयला भेट दिले.कॉम्रेड गोदुताई परुळेकर आणि कॉम्रेड शामराव परुळेकर यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात वारली आदिवासींच्या लढ्याची माहिती दिली.

यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधीकारी आकाश शिंदे यांनी स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करून मुला मुलींनी अधिकारी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
जनवादी महिला संघटनेच्या नेत्या अपर्णा दराडे,बाळासाहेब शिंदे नामदेव सूर्यवंशी,अशोक उजागरे,सोमनाथ जाधव,पावसु कऱ्हे,मिरा भांगे,जनाबाई जाधव,अर्चना जाधव,आकाश गावडे,सोनाली जाधव,ताई मेडाळे आदी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय