Sunday, March 16, 2025

टाळ्या आणि थाळ्या बडवणाऱ्या अंधभक्तानी यापासून काहीतरी शिकावे असे अमेरिकन जनतेने सांगितले – क्रांतिकुमार कडुलकर

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पुणे : अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन हे विक्षिप्त आणि जागतिक शांततेला धोकादायक आणि अमेरिकेतील समतावादी सामाजिक संस्कृतीला धोकादायक ठरलेले डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव संपूर्ण जगाला दिशा देणारा आहे, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतिकुमार कडुलकर यांनी व्यक्त केले.

ट्रेम्प यांची कारकीर्द अतिशय नकारात्मक ठरली. चीन, रशिया, युरोप आणि इराक, सिरिया, इराण, कोरिया या देशाबराबर या माणसाने कायम संघर्ष सुरू ठेवला होता. त्यासाठी ट्रम्प यांनी सर्वत्र राजकीय बोलभांड आणि अति उजव्या विचारांची जातीयवादी, धर्मांध मंडळी विशिष्ट देशात निवडून यावी यासाठी जगभर आक्रमक उचापती केल्या.

भारतात हे आपल्याला २०१९ मध्ये पाहायला मिळाले आहे. या माणसाने क्रोनी कार्पोरेट भांडवलशाहीचा मुकुटमणी बनून आणि जागतिक पातळीवर दमदाटी करून सप्तसागर, अवकाश आणि अनेक देशाच्या भूमीवर अमेरिकेच्या प्रचंड लष्करी ताकदीचा गैरवापर केला.

 

२०० वर्षे वयाच्या अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासात एक विक्षिप्त  माणूस निवडून आला होता. त्यांचा रिपब्लिक पक्ष आणि भारतातील विद्यमान राजकीय विचारसरणीने जगाला विचित्र परिस्थितीत आणून ठेवले होते.

राजनेता कसा नसावा, हे अमेरिकन जनतेने समजून घेतले आहे. डेमोक्रॅटिक पक्ष हा मध्यममार्गी पक्ष आहे. माजी राष्ट्रपती बराक ओबामा एकेकाळी याच पक्षाचे अध्यक्ष होते. जो बायडेन यांचा विजय अनपेक्षित आहे असे आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. अमेरिकन जनता भावनिक होऊन कधीच मतदान करत नाही. धर्म, जात, वंश, भाषा याच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक नेतृत्वाची अमेरिकेला गरज होती.

आर्थिक मंदी, उपासमार, उधारी, कर्जे, बेरोजगारी नको असलेल्या आणि काल्पनिक शत्रू विरोधात सुरु केलेला युद्धज्वर थांबण्यासाठी अमेरिकन जनतेने जो बायडेन याना अध्यक्ष पदी विराजमान केले आहे. नवनिर्वाचित जो बायडेन यांचे अभिनंदन !

टाळ आणि थाळ्या बडवणाऱ्या अंधभक्तानी यापासून काहीतरी शिकावे, असे अमेरिकन जनतेने सांगितले आहे, असे क्रांतिकुमार कडुलकर म्हणाले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles