Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे हे सह्यादीचा ढाण्या वाघ – दिलीप आंबवणे

---Advertisement---

पलूस (सांगली) : आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांंनी इंग्रजाना सळोकी पळो करून सोडले होते त्यामुळी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची ओळख सह्यादीचा ढाण्या वाघ अशी झाली आहे. असे मत बिरसा क्रांती दलाचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी व्यक्त केले. 

बिरसा क्रांती दल पलूस वतीने आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे व महामानव भगवान बिरसा मुंडा यांची जंयती साजरी केली.त्या वेळी ते बोलत होते.

---Advertisement---

 

आंबवणे म्हणाले, आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १८०५ रोजी देवगाव मध्ये झाला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात देवगाव हे छोटसं गावात झाला. त्या देवगावामधून क्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी बंड पुकारला आणि ह्या बंडाचे निशाण सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात मध्ये पसरू लागले त्यामध्ये सावकारशाही हा बंडाचा मुख्य विषय होता सावकारांनी अनेक लोकांना त्रास दिला असल्यामुळे क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी त्यांच्या साथीदाराबरोबर सावकारांचे दप्तर जाळून टाकून त्यांची मुंडकी कापून घराच्या आड्याला लटकवले जात असत. क्रांतीवीर राघोजी भांगरे व त्यांच्यासाठी साथीदाराझना पकडण्यासाठी इंग्रज सरकार ला अनेक गावगावच्या लोकांची मदत घ्यावी लागली मात्र इंग्रजांनी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना पकडण्यासाठी बक्षीस पुकारले होते मात्र आपल्या समाजातील काही लोक फितूर असल्यामुळे त्यांनी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना पकडून देण्यासाठी मदत केली पंढरपूर येथे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना पकडले.

ज्यावेळी राघोजी भांगरे यांना ठाणे येथील कारागृहात येथे फाशीची शिक्षा देण्यात जाहीर झाली त्यादिवशी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना साखरे दंडावर लटकवण्यात आले मात्र त्यावेळेस साखळदंड तुटला व पुन्हा दुसरी तारीख २ मे १८४८ ही देण्यात आली होती. तेव्हा दुसऱ्या वेळेस फाशी झाली. असा हा साखळदंड तोडणारा बलाड्य लढाऊ ताकतवान क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा इतिहास आता तरुणांना समजला आहे. तो इतिहास लपून राहणार नाही. 

क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे साथीदार मध्ये बाळू पिचड, लुमाजी गेंगजे, गणा आंबेकर, कोड्या नवले, सतू मराडे, भागू येंधे, हरी जोशी, रामा किरवे अशी  मोठी ताकद उभी केली होती. यापुढे क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे स्मारक हे देवगाव मध्ये केले पाहिजे असं सर्व आदिवासी समाजाला वाटत आहे. 

त्यावेळे बिरसा क्रांती दलाचे पुणे विभागीग अध्यक्ष दिलीप आंबवणे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष गुलाब भोईर, पलूस तालुका अध्यक्ष पुनाजी साबळे, सचिव कैलास मडके, वंसत भोये, छोटू अहिरे, एस एम ठाकरे, नारायण आढारी, रंगनाथ बंगाल, आंबादास गवळी आदी उपस्थीत होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles