Teacher Recruitment 2023 : काल 1 सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये 23 हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये आठ ते दहा हजार पदांची भरती होणार असून यासाठी उमेदवारांना 1 ते 8 सप्टेंबरपर्यंत ‘पवित्र’वर नोंदणी करावी लागणार आहे. (Shikshak Bharti) Teacher recruitment in the state has finally started! Registration starts today; Recruitment of 33 thousand posts
● अशी करा आपली नाव नोंदणी !
1. सर्वप्रथम आपण महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलच्या https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra या वेबसाईड ला भेट दया.
2. त्यांनतर आपणास तेथे पविञ नावाचे पोर्टल दिसेन तेथे click करा.
3. यानंतर registration वर click केल्यावर आपणास registration नावाचा फार्म दिसेन.
4. यात आपणास user id आपल्याला हवा असलेला टाका आपल्याला हवा असलेला password तयार करा तोच password conform करा.
5. यापुढे आपणास चालु मोबाईल नंबर टाका तो टाकल्यासवर आपणास त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईन तो टाका captacha टाकून registration वर शेवटी click करा.
6. अशा प्रकारे आपली registration प्रकिया पूर्ण होईन आता आपण सदर पोर्टलचे सभासद झाले आहात.
● पविञ पोर्टल 2023 वर ऑनलाईन अर्ज नोंदणी कशी करावी ?
1. सर्वप्रथम https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra/users/login या संकेतस्थळाला भेट दया.
2. त्यानंतर जो user id व password तयार केला आहे तो टाकून applicant रोल select करून login करा.
3. लॉगिन केल्यानंतर आपणास सर्वप्रथम personal information भरायची आहे यात आपण स्वताचे / आईचे / वडीलांचे नाव / जात प्रवर्ग/ जन्मतारीख /education पाञता/ माध्यम / married status / अपत्य माहिती भरायची आहे.
4. तसेच आपण ज्या शैक्षणिक संस्थेसाठी / शाळेसाठी ( जि.प/ मनपा) अर्ज करणार आहे, ते drop down box मधून सिलेक्ट करावे आपणास जास्तीत जास्त २० शाळा राज्यभरातील निवडण्याची संधी येथे उपलब्ध असणार आहे अशा पद्धतीने अर्ज भरून submit करावा.
● महत्वाची सूचना : सदर अर्ज online सादर करताना कोणतीही चूक करू नये शासननिर्णय व माहितीपुस्तिका सविस्तर अभ्यासावी कारण येथे झालेली चुक आपणास कोणत्याही परिस्थितीत दुरूस्ती करता येणार नाही.
● ‘खासगी’ची पदे 3 महिन्यानंतर पुन्हा भरता येणार
खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयांमधील बिंदुनामावली व संचमान्यतेनुसार जेवढी रिक्त पदे असतील, त्यानुसार त्यांना ‘पवित्र’वर जाहिरात अपलोड करावी लागणार आहे. पण, काही शाळांना आताच्या भरतीत सहभागी होता नाही आले आणि काही दिवसांनी त्यांची पदे रिक्त झाल्यास पुन्हा तीन महिन्यांनी भरतीत सहभागी होता येणार आहे. नवीन बदलानुसार आता खासगी संस्थांमधील शिक्षकांची भरती ‘पवित्र’वरूनच होणार आहे. त्यासाठी तीन उमेदवारांना त्या शाळांवर मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे.
● आता जिल्हाअंतर्गत बदली कायमची रद्द
प्रत्येक वर्षी जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडून राबविली जाते. आता ही बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. पण, अनेकदा पूर्वीच्या शाळांना पुरेसे शिक्षक होते, पण बदल्यांमुळे तेथे शिक्षक कमी पडतात, असा अनुभव अनेकदा आला आहे. त्यामुळे आता नवीन शिक्षक भरतीवेळी उमेदवारांकडून एकाच शाळेवर कायमस्वरूपी नोकरीसाठी तयार असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. जिल्हाअंतर्गत बदलीची पद्धत आता बंद होणार आहे. तसा प्रस्ताव आहे, पण त्यावर अजून निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
● शिक्षक भरतीची स्थिती :
1. शासकीय शाळांची पदे : 23,000
2. ‘खासगी अनुदानित’ची पदे : 8 ते 10 हजार
3. अंदाजे एकूण पदभरती : 33,000
4. बिंदुनामावली अंतिम जिल्हा परिषदा : 12
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’