Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडTATA CYCLE : बाजारात आणली इलेक्ट्रिक सायकल,1 किमी फक्त 10 पैसे

TATA CYCLE : बाजारात आणली इलेक्ट्रिक सायकल,1 किमी फक्त 10 पैसे

नवी दिल्ली : टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या स्ट्रायडर या कंपनीने भारतीय बाजारपेठेत एक नवीन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे, या इलेक्ट्रिक सायकलचे नाव Zeeta Plus आहे. अत्याधुनिक डिझाईनच्या या सायकलला 36-volt/6 Ah क्षमतेची लिथियम बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते. सायकल जवळपास 30 किलोमीटर पर्यंत पॅडल न मारता जास्तीत जास्त 25 किलोमीटर प्रतितास वेगाने 30 किमी प्रवास या सायकलने करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

फॉरेस्ट ग्रीन आणि मॅट ग्रे या दोन रंगांमध्ये ही सायकल उपलब्ध आहे. या सायकलची किंमत 31,999 रूपये इतकी आहे. मात्र कंपनी नवीन लॉन्च ऑफरमध्ये ही सायकल ग्राहकांना 25,599 रुपयांमध्ये 6000 रु सवलत देऊन विकत घेता येईल. केवळ तीन ते चार तासांतच ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होते, सायकलमध्ये ऑटो-कट ब्रेक आणि दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. सायकलच्या हँडल बारवर SOC डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. त्यावर बॅटरी रेंज,टाईम अशी माहिती दिसते.

देशभरातील 4000 रिटेल शॉपीमध्ये ही सायकल खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनी बॅटरी पॅक आणि मोटरवर 2 वर्षांची वॉरंटी आणि स्ट्रायडर झीटा प्लस इलेक्ट्रिक सायकलच्या फ्रेमवर आजीवन वॉरंटी देत ​​आहे. 5 फूट 4 इंच ते 6 फूट उंचीच्या लोकांसाठी ही सायकल चांगली आहे. त्याची पेलोड क्षमता सुमारे 100 किलो आहे. Tata Zeeta Plus Electric Bicycle म्हणजे TATA ची नवी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च 1Km चा खर्च केवळ 10 पैसे आहे,पर्यावरण पूरक,किफायतशीर अशी ही सायकल फिटनेस व प्रवासाची सोय देणारी, इंधन व मेंटेनन्स खर्चासाठी परवडणारी आहे,असे स्ट्रायडरचे बिझिनेस हेड राहुल गुप्ता यांनी म्हटले आहे.

काय सांगता ! टाटा कंपनी आता आय फोन बनवणार ?

मोशीतील आंतरराष्ट्रीय सफारी पार्कच्या कामाला ‘चालना’ ; आमदार महेश लांडगे यांनी केला पाठपुरावा

दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणा-या कोयता गॅंगवर कडक कार्यवाही ची मागणी

संबंधित लेख

लोकप्रिय