Sunday, May 19, 2024
Homeराज्यसंभाजी भिडे तथा मनोहर कुलकर्णीवर कठोर कारवाई करा –  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची...

संभाजी भिडे तथा मनोहर कुलकर्णीवर कठोर कारवाई करा –  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

मुंबई : संभाजी भिडे तथा मनोहर कुलकर्णी यांनी सभ्यपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून समता आणि मानवतावादी विचारांविषयी, तो विचार मांडण्यासाठी आयुष्य खर्च केलेल्या महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्याविषयी अतिशय आक्षेपार्ह आणि बेजबाबदार विधाने करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अतिशय तीव्र निषेध करत आहे. तसेच संभाजी भिडे तथा मनोहर कुलकर्णीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे. 

डॉ. नारकर म्हणाले, ही असंस्कृत आणि मनुवादी वृत्ती शिवाजी महाराजांच्या आणि संत ज्ञानेश्वर तुकारामांच्या काळापासून आजवर जोपासलेल्या महाराष्ट्रधर्माचा घोर अवमान करत आहे. इतक्या हीन अभिरुचीच्या इसमाचा पदस्पर्श करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जणू त्यांना राजमान्यताच दिली आहे. त्यामुळेच १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे दलितांवर हल्ले करण्यास या इसमाने चिथावणी दिली. कित्येक निरपराध लोकांचा शासकीय छळ करण्यास तो कारणीभूत झाला. 

केंद्र आणि राज्य सरकारचा वरदहस्त आणि रा. स्व. संघाचा पाठिंबा असल्यानेच हा इसम देशाला वंदनीय असणाऱ्या महापुरुषांविषयी गरळ ओकत मोकाट फिरत आहे, असा आरोपही डॉ. नारकर यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुळमुळीत भूमिका घेण्याऐवजी या देशद्रोही इसमावर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी मराठी जनता आजवर अग्रेसर राहिलेली आहे. त्या परंपरेला स्मरत, मनुवादाला मूठमाती देण्यासाठी, प्रदीर्घ लढ्यासाठी जनतेने सिद्ध व्हावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मराठी जनतेला करत असल्याचे डॉ. उदय नारकर म्हणाले.

Lic life insurance corporation

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय