पालघर : जयपुर मुंबई एक्स्प्रेसमध्ये दहिसर ते मीरा रोडदरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आरपीएफच्या जवानासह ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडल्याची माहीती आहे.
ही ट्रेन गुजरातमधून पालघरमध्ये दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती आहे. या गोळीबारात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. ते घटनेचा अधिक तपास करत आहेत.
गाडी नंबर 12956 मध्ये साडेपाच वाजण्याच्या सुमाराला गोळीबाराची घटना घडली. या गाडीतील कोच B 5 मध्ये गोळीबाराची घटना घडली असून आरपीफ जवानाचा आपसात वाद झाल्यामुळे ही घटना घडली असून कॉन्स्टेबल चेतन कुमार याने हा गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे.