Friday, May 10, 2024
Homeबॉलिवूडसुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्ये अगोदर या दोन महत्त्वाच्या घटना घडल्या

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्ये अगोदर या दोन महत्त्वाच्या घटना घडल्या

(प्रतिनिधी):- सुशांतसिंग राजपुतच्या आत्महत्येने देशभर खळबळ उडाली आहे. परंतु सुशांतच्या आत्महत्ये अगोदर तो मानसिक तणावाखाली होता आणि त्यावर तो उपचार घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्या सोबतच सुशांतच्या आत्महत्ये अगोदर त्याच्या सोबतच्या दोन घटना यात महत्वपूर्ण असल्याचे बोलले जात आहे. सुशांतच्या मॅनेजरने चार दिवसापूर्वी केलेली आत्महत्या आणि आत्महत्ये अगोदर आई विषयी टाकलेली भावनिक कविता

सुशांत लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते. सुशांत अनेकदा आपल्या सोशल मीडियावर कविता शेअर करायचा, पण यावेळी त्याने आपल्या आईच्या आठवणीत “अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे #आई”, हि कविता शेअर केली होती. आईसोबत सुशांत अनेक फोटो शेअर करत असायचा. दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतवर मानसोपचार सुरू होते. तो नैराश्यात होता आणि उपचार घेत होता. त्याच्या घरातून मेडिकल रिपोर्ट मिळाले आहेत. त्यानुसार डिप्रेशनवर तो उपचार घेत होता.

View this post on Instagram

Blurred past evaporating from teardrops Unending dreams carving an arc of smile And a fleeting life, negotiating between the two… #माँ ❤️

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

   सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियाननं चार दिवसांपूर्वीच मलाड येथे एका बिल्डिंगच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. दिशानं सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं.

View this post on Instagram

Congratulations Sexa!! ??? 6months of working with you has been an absolute bliss @fukravarun and I’m so glad that I have such an amazing milestone as ‘Chhichchorre’ to celebrate as I complete 6months with you. You have undoubtedly outdone yourself and jumped way above the benchmark you had set earlier! Thank you for giving me an opportunity to work with you and I hope I get to be a part of more such journeys of yours and the well deserved success it will bring to you! ? #chhichhore #sexa #VarunSharma #team

A post shared by @ disha265 on

   तसेच तिनं ‘फुकरे’ स्टार वरुण शर्मासाठी सुद्धा काम केलं होतं. याव्यतिरिक्त दिशानं कॉमेडियन भारती सिंह आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचेही मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं.

   असे असले तरी सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय