Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणसर्पदंश झाल्याने मुलाचा रस्त्यातच झाला मृत्यू . नागरिकांनी केली आरोग्य केंद्रात ...

सर्पदंश झाल्याने मुलाचा रस्त्यातच झाला मृत्यू . नागरिकांनी केली आरोग्य केंद्रात तोडफोड

(सुरगाणा) :- मनखेड येथील जिल्हा परिषद च्या सहावीत शिकणाऱ्या गौरव गायकवाड शेतात जात असताना सर्पदंश झाला. त्याला मनखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास आले. मनखेड येथील स्थानिक वैदयकीय अधिकारी यांनी तपासणी केली असतात. मुलाची परस्थिती ही गंभीर असल्याचे आढळून आल्याने त्यांनी सुरगाणा येथे तालुक्याच्या ठिकानी हलवण्यास सांगितले. परंतु  तिथं पर्यत जाताच रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

   मुलाचा वाटेतच मृत्यू झाल्याचे समजताचं स्थानिक वैद्यकीय अधिकारी  यांना विचारणा करण्यात आली. रुग्णालयात औषधे व लस उपलब्ध असताना मुलाला  का दिली नाही, दिली असती तर आज त्याचा प्राण वाचला असता असे आरोप करत रुग्णालयाची तोडफोड केली. तोडफोड केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. तिथे पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

              मनखेड रुग्णालयात केलेली तोडफोड

वैदयकीय अधिकारी आरोग्यसेवा देण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य समवेत मनखेड मध्ये राहत असल्याने कुणीही कायदा हातात घेऊन दबाव आणत असेल तर खपवून घेतले जाणार नाही.असा इशारा दिला. आणि सरकारी मालमत्तेचे नुसाकन करण्यावरती कठोर कारवाई करावी.

 प्रफुल्ल वसावे

अध्यक्ष, वैदयकीय अधिकारी महासंघ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय